AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ‘हा षडयंत्राचा भाग असू शकतो’, मतदान सुरु असताना संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : "निवडणूक आयोगामध्ये नरेंद्र मोदींना जाब विचारायची हिंमत आहे का? जर ही ताकद असती, तर कर्नाटकात जय बजरंग बलीचे नारा देऊन मतदानाचे बटन दाबा हे सांगितल्यावरच त्यांच्यावर कारवाई झाली असती" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : 'हा षडयंत्राचा भाग असू शकतो', मतदान सुरु असताना संजय राऊत यांचा गंभीर आरोप
sanjay raut
| Updated on: Apr 26, 2024 | 10:08 AM
Share

महाराष्ट्रात आज लोकसभेच्या आठ जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात पाच जागांसाठी मतदान झालं होतं. “आठ ही जागांवरती महाविकास आघाडीने धुवाधार प्रचार केला आहे. त्यातल्या तीन जागांवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लढत आहे आणि आमच्यासमोर चोरलेली शिवसेना असा सामना आहे. या सर्व जागा आम्ही जिंकणार” असं संजय राऊत म्हणाले. “प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. 35 प्लसच आमचं टार्गेट आहे” असं संजय राऊत म्हणाले.

EVM मशीन बंद असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावरही संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. “हे वारंवार होतं किंवा केलं जाईल. अमरावतीमध्ये तर कुठेही अघोरी कृत्य होऊ शकेल. वर्ध्यामध्ये भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं आणि मग मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणं हा षडयंत्राचा भाग असू शकतो आणि संध्याकाळ नंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात आणि नंतर ज्यांना हव्या आहेत, त्या झुंडी तिथे उभ्या राहतात. सकाळी येणाऱ्या मतदारांना ना उमेद करणं हे या निवडणुकीच्या यंत्रणेत मोदी कृत भाजपाचे षडयंत्र आहे” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

‘त्यांचा वचननामा म्हणजे फेक नामा’

“बेरोजगारांना रोजगार देणं. गुजरातमधील पळवलेले उद्योग परत आणणं. महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, दहशतवादावरती उपायोजना अशा अनेक भूमिका ज्या वचनाम्यात घेतलेल्या आहेत, त्याला विरोध आहे का?” असा सवाल संजय राऊत यांनी केला. “मोदींनी जे गेल्या दहा वर्षात यु टर्न घेतलेले आहेत, त्यांचा वचननामा म्हणजे फेक नामा आहे. आम्ही प्रथमच आमचा वचननामा तीन पक्ष एकत्र आल्यावर जाहीर केला. यांना पोटदुखी आहे, यांना सहन होत नाही” असं संजय राऊत म्हणाले.

‘नरेंद्र मोदींना जाब विचारायची हिंमत आहे का?’

“निवडणूक आयोगामध्ये नरेंद्र मोदींना जाब विचारायची हिंमत आहे का? जर ही ताकद असती, तर कर्नाटकात जय बजरंग बलीचे नारा देऊन मतदानाचे बटन दाबा हे सांगितल्यावरच त्यांच्यावर कारवाई झाली असती. अमित शहा रामललाच दर्शन मोफत करू हे सांगताना हा चुनाव आयोग कुठे होता? जय भवानी, जय शिवाजी यावर आक्षेप निवडणूक आयोग घेत आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.