PMC Recruitment Scam: पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, 11 डॉक्टरांना लुटलं, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमधे नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुणे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अकरा डॉक्टरांची प्रत्येकी दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

लक्ष्मण जाधव, प्रतिनिधी: वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना पुण्यामध्ये उघडकीस आली आहे. पुणे महापालिकेच्य अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने 11 डॉक्टरांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या डॉक्टरांची प्रत्येकी 10 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. नेमकं काय आहे हे हादरवणारे प्रकरण? वाचा…
नेमकं काय आहे प्रकरण?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमधे नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुणे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अकरा डॉक्टरांची प्रत्येकी दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या डॉक्टरांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पुणे महापालिकेने चार वर्षांपुर्वी अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज सुरु केले. या कॉलेजमधे शिकवण्यासाठी सुरुवातीला कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली.
एक वर्षांपुर्वी या मेडिकल कॉलेजमधे कायमस्वरुपी प्राध्यापकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. एम डी आणि एम एस पर्यंत शिक्षण घेतलेले 28 डॉक्टर्स त्यासाठी निवडण्यात येणार होते. मात्र त्यासाठी कंत्राटी पद्धतिने काम करणार्या या डॉक्टरांना प्रत्येकी दहा लाख रुपये द्यावे लागतील अस सांगण्यात आल. या डॉक्टरांकडून प्रत्येकी दहा लाख रुपये घेण्यात आले. मात्र त्यातील अकरा डॉक्टरांची नियुक्ती एका वर्षानंतर देखील होऊ शकली नाही.
11 डॉक्टरांची फसवणूक!
पैसे परत मागितल्यावरही ते परत न मिळाल्याने या अकरापैकी काही डॉक्टरांनी आधी महापौरांकडे तक्रार केली, कारण महापौर या मेडिकल कॉलेजच्या ट्रस्टच्या पदसिद्ध अध्यक्ष आहेत. मात्र दाद न मिळाल्याने या डॉक्टरांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलीय. विशेष म्हणजे पैसे घेण्यासाठी एजंट म्हणून तीन डॉक्टरच काम करत होते अस तक्रारदार डॉक्टरांच म्हणणे आहे. पैसे घेऊन ते पुढे देणारे डॉक्टर नानासाहेब भांगरे, डॉक्टर इरफान मुल्ला आणि डॉक्टर हेमंत वैद्य यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.