Shakti Act: पीडितेलाच अपराधी समजणारी वागणूक आधी बदलली पाहिजे, आमदार नमिता मुंदडा यांची सूचना!

| Updated on: Dec 24, 2021 | 3:25 PM

महिला अत्याचाराविरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला शक्ती कायदा  (Shakti Act)मंजूर झाला. मात्र त्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे. तसेच पीडितेला तक्रार नोंदवताना दिली जाणारी वागणूक आधी बदलली पाहिजे, अशी सूचना नमिता मुंदडा यांनी आज विधानसभेत केली.

Shakti Act: पीडितेलाच अपराधी समजणारी वागणूक आधी बदलली पाहिजे, आमदार नमिता मुंदडा यांची सूचना!
भाजप आमदार, नमिता मुंदडा
Follow us on

मुंबईः महिला अत्याचाराविरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला शक्ती कायदा  (Shakti Act)मंजूर झाला. मात्र त्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे. तसेच पीडितेला तक्रार नोंदवताना दिली जाणारी वागणूक आधी बदलली पाहिजे, अशी लक्षवेधी सूचना नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी आज विधानसभेत केली. शक्ती कायद्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी एका संयुक्त समितीचे गठन करण्यात आले होते. त्यानंतर सुधारणांसह यासंबंधीचे विधेयक हिवाळी अधिवेशनात (Winter session) मांडले गेले आणि काल 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याने या कायद्याला मंजुरी दिली.

काय म्हणाल्या नमिता मुंदडा?

भाजप आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या, ‘ शक्ती कायदा आल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करण खुप महत्वाचं आहे. फक्त कायदा आणून उपयोग होणार नाही. या शक्ती कायद्याचा फायदा आणि संरक्षण होणं गरजेचं आहे. जेव्हा कधी अशी घटना घडते तेव्हा सबंधित महिलाला मिळणारी वागणूक ही चुकीची असते.
तिला पोलिस स्टेशनमध्ये मिळणारी वागणूक ही बदलली पाहिजे. अशा वेळी संबंधित पिडीत महिलेला आधार देणारी पोलिस प्रशासन आणि यंत्रणा असावी. याबरोबरच सबंधित महिलेच्या घरी जाऊन तिच्या सर्व मेडिकल चाचण्या पार पाडाव्यात. पिडीत महिलेला अपराधी असल्याची वागणून मिळण चुकीचं आहे.

‘अधिवेशनाचा कार्यकाळ ही चिंतेची बाब’

अधिवेशनाच्या कार्यकाळाविषयी नमिता मुंदडा यांनी चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, अधिवेशनाचा कार्यकाळ ही चिंतेची बाब, दोन वर्षात एवढ्या गोष्टी मागे पडल्या आहेत की एक जास्तीत जास्त कालावधीच अधिवेशन घेण्याची मोठी गरज आहे.

2 वर्षात फक्त 20 दिवस अधिवेशन- श्वेता महाले

तसेच भाजप आमदार श्वेता महाले यांनीदेखील अधिवेशनाच्या कार्यकाळाबद्दल नाराजी व्यक्त केली, त्या म्हणाल्या, आत्तापर्यंतच्या इतिहासात आमादारांची ही एकमेव बॅच आहे, जिला दोन वर्षात फक्त 20 दिवसांच्या अधिवेशनाचा अनुभव आहे. शेतकरी, विद्यार्थी अडचणीत आहेत त्यामुळे जास्तीत जास्त कामकाज चालावं, अशी अपेक्षा होती.

इतर बातम्या-

काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला बेवकूफ बनवू नये, मुस्लिम आरक्षणावरून इम्तियाज जलील भडकले, विधानभवनात नेत्यांच्या काय प्रतिक्रिया?

रामदास कदम यांना विधानभवनात जाण्यापासून आधी अडवलं, नंतर सोडलं; फोनाफोनी कामी आली?