प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; रास्ता रोकोनंतर सहपोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले, मीनाक्षी शिंदे…

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. रास्ता रोकोनंतर सहपोलीस आयुक्तांनी महत्त्वाची माहिती दिली. यावेळी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुरू असल्याचेही सांगितले.

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; रास्ता रोकोनंतर सहपोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले, मीनाक्षी शिंदे...
pradip purnekar news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 28, 2026 | 1:50 PM

ठाण्यातील पूर्णेकर कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.  शिंदे गटाच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि पती राजेंद्र शिंदे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीयांनी रास्ता रोको केला. कुटुंबियांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केलाय. ठाण्यात पूर्णेकर हत्याकांडावरून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पूर्णेकर हत्याकांडाविषयी धक्कादायक माहिती दिली.

पोलीस सहआयुक्त पंजाबराव उगले म्हणाले,’प्रदीप पूर्णेकर प्रकरणात कापूरबावडी पोलीस ठाण्यात पप्प्या शिंदेवर गुन्हा दाखल केलाय. पोलीस आयुक्ताच्या आदेशाने 23 एसआयटी पथकाने सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहेत. राम पूर्णेकर, जयनाथ पूर्णेकर, साक्षीदारांचा जबाब नोंदवला आहे. सविस्तर माहिती घेण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. नितेश पवार आणि इतर आरोपींकडून हत्यार आणि बाईक, कार जप्त केली आहे. आरोपी बाहेर पळून जाऊ नये म्हणून विमानतळ येथे माहिती प्राप्त करून घेत होतो. पुरावे निष्पन्न झाले आहे’.

Loading...

‘तांत्रिक बाबी तपासल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि धागेदोरे जुळवत तपास सुरू आहे.  नौपाडा येथे रस्ता रोको करण्यात आला.  कापूर बावडी येथे रास्ता रोको करण्यात आला. त्याबाबत गुन्हे दाखल केला आहे. अनेक जणांना ठाण्यात वाहतूक कोंडीचा त्रास झाला. कोणीही कायदा हातात घेऊ नये. मनाई आदेश काढण्यात आले आहे. लोकांना वेठीस धरू नये, असं आवाहन आहे. राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांची चौकशी सुरू आहे. निष्पन्न झाले तर ताळमेळ बघून आणि तांत्रिक बाबी तपासून पुढील कारवाई केली जाईल. फॉरेन्सिकला सर्व सीसीटीव्ही फुटेज एकत्र करून देणार आहोत. तपासाच्या बाबी सर्व उघड करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.  तत्पूर्वी, या पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांना अनेक प्रश्न पत्रकारांनी विचारले असता त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर देण्यास टाळले’.

पूर्णेकर कुटुंबीयांचा संताप 

नरेश म्हस्के यांच्या पत्रकार परिषदेनंतर पूर्णेकर कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.  नरेश म्हस्केंनी पत्रकार परिषद न घेता समोर यावं, आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ, असं आव्हान पूर्णेकर कुटुंबीयांनी दिलं.  एवढ्या दिवसांनी नरेश म्हस्केंना आमची आठवण झाली का? असा सवाल पूर्णेकर कुटुंबीयांनी केला. आम्ही एकनाथ शिंदेंची बदनामी केली नाही, फक्त न्यायाची मागणी करत आहोत, असं पूर्णेकर कुटुंबीय म्हणाले. एकनाथ शिंदे हे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत, असा सवाल पूर्णेकर कुटुंबीयांनी केला. तसेच त्यांनी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी केली.  न्याय मिळेपर्यंत आंदोलन आणि ठिय्या सुरूच ठेवण्याचा निर्धार पूर्णेकर कुटुंबीयांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us