खडसे, तावडे, मेहता, बावनकुळे आणि पुरोहितांचे तिकीट का कापलं?

एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित आणि प्रकाश मेहता या पाचही दिग्गजांचा पत्ता कट करण्यात आला.

खडसे, तावडे, मेहता, बावनकुळे आणि पुरोहितांचे तिकीट का कापलं?


मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 164 उमेदवारांची (BJP cuts tickets) यादी जाहीर केली. यातील 12 जागा मित्रपक्षांना देण्यात आली आहेत. मात्र भाजपने दिग्गज नेत्यांची तिकीट कापली (BJP cuts tickets) आहेत. एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित आणि प्रकाश मेहता या पाचही दिग्गजांचा पत्ता कट करण्यात आला. तसं तर पहिली यादी जाहीर झाल्यावरच या पाचही दिग्गजांना तिकीट मिळणार नाही, हे स्पष्ट झालं होतं. जबाबदारी बदलल्यानं या नेत्यांना तिकीट नाकारल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. पण नेमकं खरं कारण आहे तरी काय ?

भाजपच्या 5 दिग्गजांना पत्ता कट!
एकनाथ खडसे, विनोद तावडे, राज पुरोहित, बावनकुळे आणि प्रकाश मेहता…या पाचही दिग्गजांचा पत्ता भाजपनं कट केला. खडसेंना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र मुलगी रोहिणीला तिकीट मिळालं असलं तरी खडसे एकप्रकारे दूरच झाले आहेत.

खडसेंचं तिकीट का कापलं?

  • भोसरीतील एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात खडसेंवर गैरव्यवहाराचे आरोप झाले
  • कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी कथित कॉलचेही आरोप करण्यात आले
  • फडणवीसांना महत्त्वाच्या पदी आणणारे खडसे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते
  • मुख्यमंत्रीपदाचा दावाच त्यांना महागात पडला, ते मंत्रिमंडळातून बाहेरच पडले

तावडेंचा पत्ता कट

  • विनोद तावडेंनाही भाजपनं तिकीट नाकारलं. तावडेंऐवजी सुनिल राणेंना संधी दिली आहे. तावडेंना नाकारण्याचं कारण म्हणजे शिक्षण खात्यातला गोंधळ.
  • विनोद तावडे यांच्या कार्यकाळात मुंबई विद्यापीठ 100 व्या क्रमांकावर गेलं
    आणि इतर विद्यापीठाचं रँकिंग घसरलं.
  • विविध कारणांमुळे शिक्षक संघटना नाराज झाल्या, शिक्षकांचे प्रश्न सुटले नाहीत. सेल्फी विथ स्टुडंट्स हा उपक्रम फेल गेला

राज पुरोहित

मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असलेल्या राज पुरोहितांनाही भाजपनं तिकीट दिलंच नाही. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या राहुल नार्वेकरांना भाजपनं कुलाब्यातून उमेदवारी दिली.

राज पुरोहितांना तिकीट नाकारण्याचं कारण असू शकतं, त्याचं स्टिंग ऑपरेशन. थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य त्यांना भोवलं.

चंद्रशेखर बावनकुळे

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंबद्दल तर मोठी गंमत झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांना हेच कळलं नाही की, आपलाही पत्ता भाजपच्या नेतृत्वानं कट केला आहे. सकाळपासून ते मुख्यमंत्र्यांसोबत होते. मात्र दुपारी 3 वाजता त्यांचा हिरमोड झाला. अखरेच्या क्षणी टेकचंद सावरकरांना भाजपनं एबी फॉर्म दिला.

बावनकुळे गडकरींचे जवळचे मानले जातात. त्यामुळं शाहांनी बावनकुळेंचा पत्ता कट करुन गडकरींना इशारा दिल्याची चर्चा आहे.

प्रकाश मेहता

प्रकाश मेहतांचंही तिकीट भाजपनं कापलं. मेहतांऐवजी पराग शाहांना भाजपनं उमेदवारी दिली. मेहतांना ताडदेव मिल प्रकरण भोवल्याची चर्चा आहे.

एमपी मिल प्रकरणात गृहनिर्माण मंत्री असताना मेहतांवर घोटाळ्याचा आरोप झाला. त्याचबरोबर ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले होते,’ असा शेराही फाईलवर लिहिल्यानं सभागृहात गदारोळ झाला होता.

तिकीट नाकारल्यानंतर सर्व म्हणतात, आम्ही संघस्वयंसेवक

भाजपच्या दिग्गजांना तिकीट नाकारलं असलं तरी त्यांच्या प्रतिक्रियेत एकवाक्यता आहे . संघाचा कार्यकर्ता, संघाशी एकनिष्ठ असेच शब्द तिकीट नाकारल्यानंतर या नेत्यांचे आहेत. म्हणजेच तिकीट वाटपात संघाची भूमिका किती असते हेही पुन्हा एकदा दिसून येतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI