पुण्यातील मंदार किवळेची हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, कात्रज हत्याकांडाचे हादरवणारे कनेक्शन समोर!

पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. भर दिवसा न्यायालयाबाहेरच हल्ला झाल्याने एकच खळबळ उडालीय. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय.

पुण्यातील मंदार किवळेची हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, कात्रज हत्याकांडाचे हादरवणारे कनेक्शन समोर!
pune mandir kiwale death case
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 2:31 PM

Pune Mandar Kiwale Attack : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर महाराष्ट्र हादरवून टाकणारी घटना घडली आहे. न्यायालयाच्या बाहेरच मंदार किवळे या व्यक्तीवर क्रूर पद्धतीने हल्ला करण्यात आलाय. भर दिवसा ही घटना घडली असून क्रूर हल्ल्याचे हादरवून टाकणारे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकूण पाच ते सहा आरोपींनी गोळीबार करून तसेच कोयत्याने सपासप वार करून मंदार किवळे याला गंभीर जखमी केलंय. या हल्ल्यानंतर किवेळ ही व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात फुटपाथवर पडली आहे. दरम्यान याच घटनेचं कात्रच हत्याकांड कनेक्शन समोर आलंय.

कोर्टाच्या परिसरात नेमकं काय घडलं?

या दुर्दैवी घटनेचे हादरवणारे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये गंभीर झालेला मंदार किवळे न्यायालयाच्या आवारात आल्याचे दिसतेय. याच वेळी त्याच्यावर अगोदर गोळीबार करण्यात आला. मीसफायर झाल्याने किवळेला संपवायचा विचार असल्याने त्यावर दोघांनी थेट कोयत्याने हल्ला केला. मंदारवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. मंदारने या हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तो हल्ला रोखण्यासाठी हात वर करत होता. परंतु हल्लेखोरांनी मंदारच्या थेट हातांवरही वार केले. याच हल्ल्यात मंदार गंभीर जमखी झाला. जखमी झालेल्या अवस्थेत मंदार उभे राहून चालत होता. परंतु मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो तिथेच कोसळून पडला. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत असून तो गंभीर जखमी आहे.

Loading...

नेमकं कनेक्शन काय?

पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर येथे 20 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील कात्रज जमिनीच्या आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण या तरुणाचा खून झाला होता. मंदार मारुती किवळे हा याच खून प्रकरणातील आरोपी आहे. चार दिवसापूर्वी तो कारागरातून बाहेर आला होता. आज न्यायालयीन कामकाजासाठी तो पुण्यातील न्यायालयात आला होता. याच वेळी मंदार किवळेवर हल्ला करण्यात आला. दरम्यान या हादरवून टाकणाऱ्या हल्ल्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गंभीर बनत चालला असल्याचा संताप व्यक्त केला जातोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us