भर दिवसाढवळ्या पुणे कोर्टाबाहेर आरोपीची हत्या, 4 दिवसापूर्वीच जामीन, 5 जण दुचाकीवरून आली अन् काटा काढला..
पुणे कोर्टाबाहेर एक मोठी घटना घडली. चक्क कोर्टाबाहेर गोळीबार करण्यात आला असून कोयत्याने वार केले. या हल्ल्यात मंदार किवळे याचा जागीच जीव गेला. या प्रकरणात आता मोठी अपडेट पुढे येत आहे.

पुणे कोर्ट गेट क्रमांक 4 बाहेर धक्कादायक घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून पुणे कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली जात होती. त्यातच पुणे कोर्टाबाहेर कोणीही ज्याचा विचार केला नाही, अशी घटना घडली. पोलिस स्टेशन, कोर्ट अशाठिकाणी कोणावर हल्ला होईल, याचा विचारही कोणी करू शकत नाही, पण पुणे कोर्टाबाहेर हे घडले. एका हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या व्यक्तीवर पुणे कोर्टाबाहेर पाच ते सहा जणांनी हल्ला केला. पहिल्यांदाच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. पण निशाणा चुकला. त्यानंतर हल्लेखोरांनी थेट या व्यक्तीवर कोयत्याने सपासप वार केले. पुणे कोर्ट म्हणजे वर्दळीचे ठिकाण आहे. तिथे हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी या हल्ल्यानंतर पळ काढला.
हेच नाही तर बंदूक घटनास्थळीच फेकून देत हल्लेखोर पळून गेले. या गोळीबारानंतर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतंय. शिवाय उपस्थित अजून काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे. हा व्यक्ती एका हत्या प्रकरणातील आरोपी होता. शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील हा व्यक्ती आरोपी होता. तो पुणे कोर्टात आला होता.
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत उशीरा झाला होता. आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यादरम्यान प्रत्यक्षदर्शींनी मोठा दावा केला आहे, आम्ही तात्काळ 100, 108 नंबरवर फोन केले पण एकही फोन लागला नसल्याचा दावा प्रत्यदर्शींकडून करण्यात आला. आता या घटनेचा पूर्ण सीसीटीव्हीही पुढे आला आहे.
मृत व्यक्ती हा कात्रजचा राहणारा असल्याची माहिती मिळत आहे. त्याचे नाव मंदार किवळे असल्याचे कळत आहे. हल्लेखोरांचा नेम चुकल्यानंतर त्यांनी मंदारवर कोयत्याने अनेक वार केले. पुणे कोर्ट गेट नंबर 4 वर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वकिलांसह कोर्टात उपस्थित असलेल्या लोकांनी धाव घेतली. मंदार किवळे याने शुभम चव्हाण याची हत्या केली होती. 20 एप्रिल 2025 मध्ये कात्रजमध्ये शुभम चव्हाण याची हत्या मंदार याने केली होती.
