AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : MBA केलेल्या जोडप्याने नोकऱ्या सोडल्या, अन् घराच्या किचनमधून सुरू केला व्यवसाय, आता करत आहेत लाखोंची कमाई

नोकरी चांगली सुरू आहे, दर महिन्याला पगारही हातात मिळतोय, मग आणखी वेगळं काही करण्याची गरजच कायं? असा विचार अनेक जण करतात. पण या जोडप्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी चक्क लाखोंच्या पॅकेज असलेल्या नोकऱ्या सोडल्या आणि स्वत:चा व्यवसाय सुरू केला.

Success Story :  MBA केलेल्या जोडप्याने नोकऱ्या सोडल्या, अन् घराच्या किचनमधून सुरू केला व्यवसाय, आता करत आहेत लाखोंची कमाई
success story Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 25, 2026 | 2:14 PM
Share

नोकरी चांगली सुरू आहे, दर महिन्याला पगारही हातात मिळतोय, मग आणखी वेगळं काही करण्याची गरजच कायं? असा विचार अनेक जण करतात. पण या जोडप्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी चक्क लाखोंच्या पॅकेज असलेल्या नोकऱ्या सोडल्या आणि स्वत:चा व्यवसाय सुरू केला. नोकरी तर चांगली होतीच पण स्वत:चा व्यवसायाची कल्पना त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. अखेर दोघांनी काहीतरी करायचं ठरवलंच आणि उभा केला लाखोंची टर्नओव्हर असणाऱ्या खाखरा ब्रँड. मुलीच्या नावाने सुरू केलेला हा ब्रँड देशभरात पोहोचला आहे.

आधी घेतलं शिक्षण,मग सुरू केला प्रयोग

हे जोडपं मुळचं मध्य प्रदेशातील आहे. पण नोकरी निमित्ताने ते संभाजीनगर येथे स्थायिक झाले. मनोज आणि मोनिका यांनी व्यवसाय सुरू करण्याआधीच खाद्यपदार्थ तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं. मनोज यांनी नोकरी सोडून कुकिंग क्लासेस लावले. त्यानंतर दोघांनी वेगवेगळे पदार्थ बनवून त्यावर प्रयोग देखील केले. बाजारात मिळतो त्यापेक्षा खाखरा कुरकुरीत कसा होईल. चव कशी असावी. ग्राहकांना नक्की काय आवडेल. यावर त्यांनी विशेष लक्ष दिले.

सुरूवातीला घरातचं खाखरे तयार करून लोकांना चाखण्यासाठी दिले. नातेवाईतकांचा, मित्रांचा चांगला प्रतिसाद मिळ्यानंतर त्यांनी याच व्यवसायावर लक्ष केद्रिंत करण्याचे ठरवले. हळूहळू वेगवेगळ्या चवींचे खाखरे तयार करण्यास सुरूवात केली.

MBA केलेल्या मोनिकानेही सोडली नोकरी

मोनिक लाड यांनी MBA पर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्या व्यवसाय सांभाळत नोकरीही करू पाहत होत्या. पण व्यवसायातून चांगला प्रतिसाद मिळू लागला होता. याशिवाय नोकरीसोबत घर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणं सोपं नव्हतं. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी मनोज यांच्यासोबत तयारी केली. त्यांच्या या ब्रँडला त्यांनी ‘श्रीनिका’असे नाव दिले हे त्यांच्या मुलीचेच नाव आहे.

खाखऱ्यापासून ते 150 प्रोडक्ट्स बनवण्याचा व्यवसाय

सुरूवातीला घराच्या किचनमधून सुरू झालेला हा खाखऱ्यांचा व्यवसाय आता वाढला. हे जोडप आता खाखरा विकण्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे प्रीमीक्स, मसाले देखील आता विकत आहे. यासोबत मिठाई बनवण्यासाठी लागणारे प्रीमिक्स सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे.

मनोज आणि मोनिका यांनी व्यवसायाची सुरूवात महाराष्ट्रातील संभाजीनगर येथून केली. तिथे ग्राहाकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला.मध्य प्रदेशातील इंदूर, खंडवा पर्यंत त्यांचा व्यवसाय विस्तारलेला आहे.

आपला ब्रँड आणि उत्पादन वाढवण्यासाठी सोशल मिडियाही वापर करत आहेत. खाखऱ्यांच्या विविध प्रकारांमध्ये वाढ करून ब्रँड अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या व्यवसायात आता त्यांना लाखोंचा फायदा होत आहे. नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय,सुरूवातीला घेतलेलं प्रशिक्षण उत्पादनांवर केलेले प्रयोगामुळे आज त्यांना लाखोंचा फायदा होत आहे. घराच्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला हा प्रवास आता मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचत आहे.

Follow Us
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा
ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? शिरसाटांनी पहिल्यांदा सांगितलं कारण
Sanjay Shirsat on Raut : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाले...
राऊतांच्या आरोपांना शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला
Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊतांच्या आरोपांना संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला
2003 मध्ये फेटाळलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा? अदानी कंपनीला...
Amravati : 2003 मध्ये फेटाळलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा? अदानी कंपनीला कायदेशीर नोटीस
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर मुबई हायकोर्ट मध्ये सुनावणी...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर मुबई हायकोर्ट मध्ये सुनावणी
नागपूरमध्ये उद्या कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा, दिपके नागपूरला रवाना
CJP Protest : नागपूरमध्ये उद्या कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा, अभिजित दिपके नागपूरला रवाना
राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा...
Raj thackeray : राज ठाकरे मैदानात उतरणार, 28-29 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौरा; निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी