
भारतातील नंदनवन अशी ख्याती असलेलं काश्मीर काल रक्तबंबाळ झाला. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये काल दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून, हल्ला करत अनेक पर्यटकांचा जीव घेतला. यामध्ये आत्तापर्यत 25 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये भारतीयांसह परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटक मृत्यूमुखी पडले असून त्यामध्ये पुण्याचे2, डोंबिवलीचे 3 तर नवी मुंबईतील एकाचा समावेश आहे. पुण्यात राहणारे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे हे कुटुंबियांसह काश्मीरमध्ये फिरायला गेले होते, मात्र तेथे दहशतवाद्यांनी मारलेल्या गोळीने त्यांचा बळी गेला.
पुण्यात राहणारे कौस्तुभ गनबोटे यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या काकूला तर अक्षरश: अश्रू अनावर झाले आहेत. कौस्तुभ यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या डोळ्यातील पाण्याला खळ नव्हता.
आईसारखं प्रेम दिलं हो मला..
कौस्तुभ, त्याची पत्नी संगीता, जगदाळे, त्यांची, पत्नी आणि जगदाळेंची मुलगी असे सरगळे काश्मीरला फिरायला गेले होते. त्यांच्याशी काहीच संपर्क झाला नाही. अगदी 2-3 दिवसांपूर्वीच ते फिरायला गेले होते, असं कौस्तुभ यांच्या काकूने सांगितलं. आत्ता शनिवारीच ते काश्मीरला रवाना झाले.
कौस्तुभच्या आठवणीबद्दंल विचारल्यावर त्यांच्या काकूंना भरून आलं. त्याच्या मृत्यूची बातमी मनाला अतिशय दुःख देणारी आहे. सर्वांना समजून घेणारा सर्वांशी मित्रत्वाने वागणारा कौस्तुभ आज नाही याची कल्पना करूच वाटत नाही. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा त्यान मला इतकी मदत केली. कौस्तुभ यांच्याबद्दल बोलताना त्यांना हुंदकाच फुटला. त्याने मला त्याची चुलती, ताकू कधी मानलंच नाही हो. त्याने मला अगदी आईसारखं प्रेम दिलं हो, असं म्हणाताना काकूंना अश्रू अनावर झाले.
प्रशासनाने मला अजून काहीच माहिती दिली नाही, कोणीच संपर्क साधला नाहीये. कौस्तुभच्या मृत्यूची बातमी आज सकाळी मला समजली आधी फक्त तो जखमी आहे एवढेच माहिती होतं. रात्री मी सुनेला फोन केला होता, तेव्हा तो जखमी आहे एवढंच कळलं होतं, आज सकाळी मृत्यूची बातमी समजल्यामुळे खूप दुःख झालंय, असं काकूंनी सांगितलं.
जगदाळे, गनबोटेंचं पार्थिव आज पुण्यात आणणार
समोर आलेल्या माहितीनुसार, काल दहशतवाद्यांनी केलेलेल्या भ्याड हल्ल्यात गोळी लागून संतोष जगदाळे आणि गनबोटे हे जखमी झाले होते, त्यांचा आजा मृत्यू झाला कालपासून जगदाळे यांच्या घरी त्यांच्या नातेवईकांनी गर्दी केली.केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हेही या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात येणार आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे देश प्रचंड हादरला असून सर्व स्तरांतून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.