एक महिन्यापूर्वीच… पुणे इमारत दुर्घटनेची धक्कादायक माहिती समोर, महिलेच्या नातेवाईकाने जे सांगितलं…

Moshi Building Accident : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो परिसरात एक इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 15 लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. आतमध्ये अडकलेल्या एका महिलेच्या नातेवाईकाने धक्कादायक माहिती दिली आहे.

एक महिन्यापूर्वीच... पुणे इमारत दुर्घटनेची धक्कादायक माहिती समोर, महिलेच्या नातेवाईकाने जे सांगितलं...
pune Moshi Building update
Image Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड | Updated on: Jul 08, 2026 | 6:26 PM

पुण्यात आज धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो परिसरात एक इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 15 लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या घटनास्थलावर आर्मी, अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथके बचावकार्य करत आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. अशातच आता आतमध्ये अडकलेल्या एका महिलेच्या नातेवाईकाने धक्कादायक माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एक महिन्यापूर्वीच…

मोशीतील इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या एका महिलेच्या नातेवाईकाने सांगितले की, इमारत कोसळली ही माहिती तिच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून मिळाली. साधारण दीड वाजता ही घटना घडली. त्यापूर्वी एक महिने आधी तिने मला सांगितलं होतं की पाठीमागील कचरा इमारती वरती येत आहे. या दुर्घटनेमध्ये प्रशासनाची चूक आहे प्रशासनाने खबरदारी घ्यायला हवी होती. मी तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा फोनची रिंग वाजली मात्र फोन उचलला नाही. तिला काही तासांपासून बाहेर काढण्याचं शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र मनामध्ये धाकधूक आहे. मी आशा करतो की यामध्ये अडकलेले सर्व नागरिक सुखरूप बाहेर पडतील.

Loading...

मुख्यमंत्र्यांनी घेतली अपघाताची माहिती

मोशी येथील इमारत दुर्घटना प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्तांकडून माहिती घेतली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्यात 15-16 लोक अडकले आहेत, पण सर्व सुरक्षित आहेत. एनडीआरएफ, लष्कराची तुकडी, पोलिस, अग्निशमन दल तिथे आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार अधिकाऱ्यांच्या संपर्कात

मोशी अपघातासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंगल, पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी संपर्क साधला आणि दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या तसेच जखमी झालेल्या व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us