MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन कशासाठी? सरकारनं दखल घेतली, कोणता मोठा निर्णय होणार?

| Updated on: Jan 31, 2023 | 3:03 PM

पुण्यातील अलका टॉकीज चौक येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन सुरू करण्यात आले होते, यामध्ये गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते.

MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन कशासाठी? सरकारनं दखल घेतली, कोणता मोठा निर्णय होणार?
Image Credit source: Google
Follow us on

पुणे : यूपीएससी प्रमाणे एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यासाठी पुण्यात आज अलका टॉकीज चौक परिसरात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. अराजकीय साष्टांग दंडवत असं या आंदोलनाला नाव देण्यात आले होते. या आंदोलनात गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विद्यार्थ्यांचे प्रश्न फोनद्वारे कळविले होते. यावेळी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असे कळविले होते. त्यावरून विद्यार्थ्यांनी निर्णय होईपर्यन्त आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेतली होती त्यावरून 2025 पासूनच हा नवा पॅटर्न लागू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच त्याबत घोषणा केली जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती देत एमपीएससीच्या बाबत निर्णय घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत तत्वता मान्यता दिली असून एमपीएससीला याबाबत विनंती केली जाणार आहे.

पुण्यातील अलका टॉकीज चौक येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन सुरू करण्यात आले होते, यामध्ये गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते.

एमपीएससीकडून नवा पॅटर्न लागू करण्यात आला आहे. तो 2025 पासून लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोपीचंद पडळकर यांनी फोनद्वारे माहिती दिली होती.

हे सुद्धा वाचा

गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपचे आमदार अभिमन्यू पवार हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये सरकारच्या माध्यमातून यामध्ये तोडगा काढला जाईल अशी माहिती देण्यात आली होती.

त्यानुसार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेण्यात आली असून सरकारच्या माध्यमातून एमपीएससीला विनंती करण्यात आली असून लवकरच घोषणा केली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आंदोलक विद्यार्थ्यांना देण्यात आली असून त्यांनंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.