AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहिणी खडसेंची पतीला वाचवण्यासाठी धडपड, शरद पवारांच्या भेटीला, प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि मुलींचे…

Rohini Khadse and Sharad Pawar meet : पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू असताना पोलिसांनी छापेमारी केली आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला अटक केली. यानंतर थेट गंभीर आरोप करण्यात आली. आता रोहिणी खडसे या शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्या आहेत.

रोहिणी खडसेंची पतीला वाचवण्यासाठी धडपड, शरद पवारांच्या भेटीला, प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि मुलींचे...
Rahini khadse
| Updated on: Aug 02, 2025 | 9:32 AM
Share

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरला पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले आणि मोठी खळबळ उडाली. पुण्यातील खराडी भागात ही पार्टी सुरू होती आणि रूम देखील खेवलकरांच्या नावानेच बुक करण्यात आली. या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ देखील पुढे आले. धक्कादायक बाब म्हणजे पुरूषांसोबतच काही महिलांचा देखील या रेव्ह पार्टीत सहभाग होता. सध्या रेव्ह पार्टी प्रकरणी सात जण कोठडीत असून त्यांना पुणे कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रोहिणी खडसे पोहोचल्या शरद पवारांच्या भेटीला 

प्रांजल खेवलकरचा जामिनासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. हेच नाही तर कालच खेवलकरांच्या जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला जाईल, असे बोलले जात होते. कोर्टाने नाथाभाऊंच्या जावयासह 4 जणांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या पार्टीतून पोलिसांना कोकेन आणि गांजा मिळालाय. यासोबतच दारूच्या देखील पोलिसांनी पार्टीतून जप्त केली.

पती प्रांजल खेवलकर न्यायालयीन कोठडीत 

पती प्रांजल खेवलकर हा न्यायालयीन कोठडीत असताना आता रोहिणी खडसे या थेट शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत. रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याकडून पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप करण्यात आले. पुणे पोलिसांच्या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. पुणे पोलिस कोणाच्यातरी सांगण्यावरून काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. यादरम्यान आमदारर रोहित पवार यांनी देखील पुणे पोलिसांवर आरोप केली.

एकनाथ खडसेंचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप 

आता यादरम्यानच थेट रोहिणी खडसे या शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्या आहेत. या भेटीमध्ये काय चर्चा होते, शरद पवार या सर्वांवर काही भाष्य करतात का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितले की, आरोपी प्रांजल खेवलकर याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि व्हिडीओ सापडली आहे. त्याने दुसऱ्या आरोपी मेसेज करून माल आण असे म्हटले आहे. यासोबतच मुलीचा व्हिडीओ शेअर करत असा माल पाहिजे असल्याचे म्हटले.

Follow Us
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी...
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?
आमदार फोडण्यासाठी पैसे, तरुणांसाठी नाहीत; ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी
अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुळेंचा सरकारला थेट सवाल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल
एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या' - Sanjay Raut
Sanjay raut UNCUT | एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या, तुम्ही...' संजय राऊतांचं अमित शाहांबाबत खळबळजनक विधान
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! PA ने...
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच... भाजपमध्ये मोठ्या घडामोडी