AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलींचे व्हिडिओ, आक्षेपार्ह मेसेज… नाथाभाऊंच्या जावयाला रेव्ह पार्टी प्रकरणातून आज मिळणार जामीन?, कोर्टात…

पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू असताना पुणे पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीमध्ये थेट एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. यानंतर थेट एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांवरच आरोप केली. आता याप्रकरणात मोठी अपडेट पुढे आलीये.

मुलींचे व्हिडिओ, आक्षेपार्ह मेसेज... नाथाभाऊंच्या जावयाला रेव्ह पार्टी प्रकरणातून आज मिळणार जामीन?, कोर्टात...
Pranjal Khewalkar
| Updated on: Aug 01, 2025 | 12:13 PM
Share

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि व्हिडीओ पोलिसांना मिळाल्याची माहिती त्यांनी कोर्टात दिली. प्रांजल खेवलकर यांच्यासाठी पत्नी रोहिणी खडसे आणि सासरे एकनाख खडसे हे मैदानात उतरले. यादरम्यान खडसेंनी पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केली आणि कोर्टात जाणार असल्याचे थेट म्हटले.

काल या रेव्ह पार्टीबद्दल पुणे कोर्टात सुनावणी झाली आणि प्रांजल खेवलकरांसह इतर 4 आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. यामुळे यांचा जामिनाचा मार्ग मोकळा आहे. आता नुकताच या प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट आलीये. प्रांजल खेवलकरांचे वकील आज कोर्टात खेवलकरांच्या जामिनासाठी अर्ज करणार आहेत. सध्या प्रांजल खेवलकरांचा मुक्काम हा येरवडा जेलमध्ये आहे.

प्रांजल खेवलकरांना आज जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रांजल खेवलकर यांनी या पार्टीतील दुसऱ्या आरोपीला मुलीचे व्हिडीओ पाठवत म्हटले होते की, असा माल हवा आहे. यासोबतच खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काही धक्कादायक व्हिडीओ देखील पोलिसांना तपासात मिळाली आहेत. पोलिसांनी ही माहिती कोर्टात दिलीये. धक्कादायक म्हणजे ज्या पार्टीतून प्रांजल खेवलकरला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्या पार्टीत काही महिला देखील उपस्थित होत्या.

प्रांजल खेवलकर याने कोर्ट परिसरात बोलताना पत्नी रोहिणी खडसेला त्या मुलींशी माझा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले होते. हेच नाही तर पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांनी तब्बल 24 तासांपेक्षाही जास्त वेळानंतर एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत सत्य बाहेर येईल, असे म्हणताना दोघांचा एक फोटो शेअर केला होता. माझ्या जावयाला फसवण्यात आल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. आता बाहेर आल्यानंतर प्रांजल खेवलकर काय बोलणार हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?