Pune: प्रकरण तापलं! रवींद्र धंगेकरांना ‘ती’ टीका नडली, समीर पाटलांनी ठोकला 50 कोटींचा दावा

पुण्यातील गुंड निलेश घायवळ देशाबाहेर फरार झाला आहे. याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना पाटील यांनी उत्तर दिले आहे.

Pune: प्रकरण तापलं! रवींद्र धंगेकरांना ती टीका नडली, समीर पाटलांनी ठोकला 50 कोटींचा दावा
Sameer Patil and Ravindra Dhangekar
Updated on: Oct 14, 2025 | 5:16 PM

पुण्यातील गुंड निलेश घायवळ देशाबाहेर फरार झाला आहे. याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समीर पाटील यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे असं धंगेकर यांनी म्हटलं होतं. मात्र आता या टीकेमुळे समील पाटील यांनी आक्रमक होत धंगेकर यांच्यावर 50 कोटींचा मानहाणीचा दावा ठोकला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

धंगेकरांकडे कोणतेही पुरावे नाहीत

समीर पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, ‘मला काही खुलासे करायचे आहेत. ते आठ दिवसांपासून माझं नाव घेत आरोप करत आहेत. त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात कामाला आहे का? त्याचा त्यांच्याकडे पुरावा नाही. मी मोक्का मधील गुन्हेगार आहे? त्याचा पुरावा नाही. मला सांगावं वाटत की आरोप करण्याआधी पुरावे गोळा करून आरोप करायचे असतात.

यानंतर समीर पाटील यांनी एक व्हिडिओ दाखवला. यानंतर पाटील म्हणाले की, ‘यात सागर गवसणे इसम आहे, हा कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा आहे माहिती नाही. याच्यावर धाराशिव, नगर , जामखेड , शिवाजीनगर इथे गुन्हे दाखल आहेत. 2009 पासून 25 पर्यंत 9 गुन्हे आहेत. 13 तारखेला गोळीबार झालेली आहे. मी या इसमाला ओळखत नाही. मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला फोन केलेला नाही असं पाटील यांनी म्हटलं आहे.

मी स्वच्छ आहे – पाटील

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, ‘त्यांनी मी मोक्कामधील आरोपी आहे हे सांगितलं. मी अशा लोकांना उत्तर देणार नाही. धंगेकर म्हणतात माझ्यावर पण गुन्हे आहेत, मी त्यांना उत्तर का देऊ. मी तर स्वच्छ आहे. कोथरुडकरांनी ठरवाव आता गुन्हेगारांना पाठीशी कोण घालत आहे. माझ्या वकिलांनी नोटीस इश्यू केली आहे. अब्रु नुकसानीचा 50 कोटींचा दावा दाखल केला आहे, अशी माहिती समीर पाटील यांनी दिली आहे.