मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान, शुभमच्या भावाने मृतदेहासमोरच…; काय आहे संपूर्ण प्रकरण?

मंदार किवळेवर टोळक्याने हल्ला करण्याच प्लान आधीच रचला होता. शुभम चव्हाणच्या भावाने संपूर्ण कट रचल्याचे समोर आलं आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान, शुभमच्या भावाने मृतदेहासमोरच...; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pune mandar kiwale news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 9:07 AM

पुणे शिवाजीनगर भागात असलेल्या सत्र न्यायालयाच्या आवारात मंदार किवळेवर कोयत्याने हल्ला केला. कोर्टाच्या आवारात मंदारवर हल्ला करून हात तोडल्यानंतर एकच खळबळ उडाली.  35 वर्षीय मंदार किवळे या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. आता या प्रककणी धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. शुभम चव्हाणच्या भावानेच मंदारवर हल्ला करण्याचा प्लान रचला होता. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पुण्यातील सत्र न्यायालयासमोर दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास संपूर्ण प्रकार घडला. दुचाकीवर असलेल्या दोघांनी मंदारवर गोळीबार केला. परंतु गोळी व्यवस्थित लागली नाही. त्यामुळे हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्लेखोरांनी मंदारचे हात तोडले. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंदारला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

Loading...

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

पुण्याच्या कात्रज भागात शुभम चव्हाण या तरुणाची 2025 साली हत्या करण्यात आली होती. मालमत्तेच्या वादातून त्याची हत्या झाली होती. लाकडी ओंडके आणि बांबूच्या काठ्यांनी मारहाण करून चव्हाणची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी चार जणांना अटक केली होती.  शुभम चव्हाण हा संतोष नगर येथील रहिवासी होता. या भागात रेस्टॉरंट देखील होता. घराशेजारील जमिनीवरून शुभम चव्हाण आणि अमर सोकोरेचा वाद सुरू होता. त्यातून चौघांनी मिळून चव्हाणला मारहाण करून संपवलं. चव्हाणला संपवल्यानंतर आरोपी पळून गेले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात कामती येथून आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली होती.  शुभमचा भाऊ आणि त्याच्या मित्राने शपथ घेतली होती. शुभमच्या हत्येचा बदला घेणार असल्याचा निर्धार त्यांनी घेतला होता. त्यानंतर या प्रकरणात आरोपी मंदार केवळे तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर दोन दिवसातच ६ जणांच्या टोळक्यांनी जीवघेणा हल्ला केला.

दरम्यान,  मंदार किवळे हल्ला प्रकरणातील सहा आरोपींची ससून रुग्णालयात मेडिकल पूर्ण झाली आहे. पहाटे 5 च्या दरम्यान या सहा आरोपीची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे. आज गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास या आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करणार आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 9 आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us