Pune crime| अबब! थोडे थोडकी नव्हेतर 3800 किलो तंबाखू जप्त ; पुणे पोलिसांनी इथे केली करवाई

पोलिसांनी सापळा रचून पुणे - सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा येथे या पदार्थाची विक्री करणारा ट्रक पकडला. कारवाई दरम्यान वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक ताब्यात घेत आरोपीला अटक केली आहे. पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट नंबर 6 ने ही करवाई केली आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी गणपत कोकणे यांनी लोणी काळभोर पोलीसात तक्रार दिली आहे.

Pune crime| अबब! थोडे थोडकी नव्हेतर 3800 किलो तंबाखू जप्त ; पुणे पोलिसांनी इथे केली करवाई
pune-police
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 10:12 AM

पुणे – राज्यात गुटखा (Gutkha)व गुटखा मिश्रित सुंगंधीत सुपारी व तंबाखूचे ( tobacco) उत्पादन साठवणूक वितरण यावर बंदी असतानाही बेकायदेशीररित्या गुटखा व तंबाखू विक्री करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी(Pune Police) कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल तीन हजार 861  किलो विमल पण मसाला आणि तंबाखूची 25 पोती जप्त केली आहेत. पोलिसांनी एकूण 56  लाखांचा मुद्देमालजप्त केला आहे.

अशी केली कारवाई

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार राज्यात गुटखा व सुंगंधीत सुपारीच्या विक्रीस व साठवणुकीस बंदी असताना याची विक्री होते असल्याची माहिती मिळाली.  या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पुणे – सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा येथे या पदार्थाची विक्री करणारा ट्रक पकडला. कारवाई दरम्यान वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक ताब्यात घेत आरोपीला अटक केली आहे. पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट नंबर 6 ने ही करवाई केली आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी गणपत कोकणे यांनी लोणी काळभोर पोलीसात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी प्रवीण दुर्योधन जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

कोकोन विक्री प्रकरणी नायजेरियन नागरिकाला अटक

मागील आठवड्यात शहरातील कोकेन या अंमलीपदार्थाची विक्री करताना, नायजेरियन नागरिकाला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. लष्कर परिसरात ही करवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान 5 लाखांचे कोकेन पोलिसांनी जप्त केलं. अटक करण्यात आलेला आरोपी मुंबई येथून कोकेनच्या विक्रीसाठी पुण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वर्धा कार अपघातात भाजप आमदाराचा मुलगा अविष्कार रहांगडाले याचा मृत्यू

VIDEO : पुष्पा चित्रपटातील ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावर बाप-लेकीचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ!

Srinabha Agrawal : नागपूरकर श्रीनभ अग्रवालचा राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मान; श्रीनभनं नेमकं काय केलं?