VIDEO : पुष्पा चित्रपटातील ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावर बाप-लेकीचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ!

VIDEO : पुष्पा चित्रपटातील 'तेरी झलक अशरफी श्रीवल्ली...' गाण्यावर बाप-लेकीचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ!
डान्स व्हिडीओ व्हायरल

सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा 'पुष्पा' (Pushpa) चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. चाहत्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 25, 2022 | 9:54 AM

मुंबई : सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. चाहत्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे. तसेच त्यातील गाण्यांनाही पसंती दिली जात आहे. या चित्रपटातील गाणे अनेकांच्या तोंडामध्ये आहेत. इतकेच नव्हेतर प्रत्येकजण या चित्रपटामधील गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे.

सध्या सोशल मीडियावर बाप आणि लेकीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बाप आणि लेक ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बाप आणि लेकीची जोडी अल्लू हुक स्टेप्समध्ये डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही pabloeveronicaoficial नावाच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. लोकांना हा व्हिडीओ एवढा आवडला आहे की त्यांना तो पुन्हा पुन्हा बघायला आवडतो आहे.

नेटिझन्सनी या व्हिडिओवर बरेच इमोटिकॉन्स शेअर केले आहेत. एका युसरने लिहिले आहे की, खूप गोड… भारताकडून खूप प्रेम, देव तुम्हाला आणि तुमच्या लाडक्या मुलीला आशीर्वाद देवो. दुसर्‍या यूजरने लिहिले की, अप्रतिम डान्स, तुम्ही दोघे खूप क्यूट आहात. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक इमोजीही पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे.

संबंधित बातम्या : 

Video : डेव्हिड वॉर्नरच्या मुलीही म्हणतायत ‘सामी-सामी’, डान्स पाहून अल्लू अर्जुनही झाला खुश

Russell’s Viper : शेपटीच्या सहाय्यानं कसा भिंतीवर चढाई करतोय घोणस! ओळखा आणि सावध व्हा

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें