Video : डेव्हिड वॉर्नरच्या मुलीही म्हणतायत ‘सामी-सामी’, डान्स पाहून अल्लू अर्जुनही झाला खुश

Video : डेव्हिड वॉर्नरच्या मुलीही म्हणतायत 'सामी-सामी', डान्स पाहून अल्लू अर्जुनही झाला खुश
डान्स करताना डेव्हिड वॉर्नरच्या मुली

स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर(David Warner)च्या मुलींचा डान्स व्हिडिओ (Dance Video) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या 'पुष्पा : द राइज' (Pushpa The Rise) चित्रपटातील 'सामी-सामी' गाण्या(Sami Sami Song)च्या डान्स स्टेप्स कॉपी करत आहे.

प्रदीप गरड

|

Jan 25, 2022 | 8:36 AM

Pushpa Dance Steps : साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा : द राइज’ (Pushpa The Rise) चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. चाहत्यांना हा चित्रपट जसा आवडला आहे तसेच त्यातील गाण्यांनाही पसंती दिली जात आहे. त्याचे डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर(David Warner)च्या मुलींचा डान्स व्हिडिओ (Dance Video) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या चित्रपटातील ‘सामी-सामी’ गाण्या(Sami Sami Song)च्या डान्स स्टेप्स कॉपी करत आहेत.

लोक करत आहेत कॉपी

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील संवाद, गाणी आणि स्टाइल लोकांच्या पसंतीस उतरत आहे. लोक कॉपी करत आहेत. क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा हा डान्सही खरंच खूप छान आहे. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. इतकंच नाही तर अल्लू अर्जुननं स्वतःही या डान्स व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. आता यावरून तुम्ही सर्वजण अंदाज लावू शकता, की हा डान्स व्हिडिओ आणि हे गाणं किती छान आहे.

प्रचंड क्रेझ

लोकांमध्ये या गाण्याची प्रचंड क्रेझ असून त्यावर जोरदार व्हिडिओ बनवले जात आहेत. या डान्सचा व्हिडिओ स्वत: डेव्हिड वॉर्नरनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की आई आणि वडिलांच्या आधी या मुलींना ‘सामी-सामी’ गाण्यावर डान्स करायचा होता. या पोस्टसोबत वॉर्नरनं हसणारे इमोजीही शेअर केले आहेत.

अल्लू अर्जुननंही दिली प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया यूजर्सना क्रिकेटरच्या मुलींच्या डान्स आवडलाय. त्यांचं कौतुकही होत आहे. या व्हिडिओवर चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुननंही प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये त्यानें लिहिलंय, की खूप क्यूट. यासोबतच त्यानं दोन हृदय आणि हसणारे इमोजीही शेअर केले आहेत. डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तसंच तो दररोज त्याच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत असतो.

गावरान Feel वाला Song : सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेली ‘Majhi Baay Go’ पाहाच

Video : ‘जोर का झटका जोरों से लगा’; विचार करून स्टंट करा, नाहीतर ‘असं’ तोंडावर आपटावं लागतं!

विराट कोहली-अनुष्का शर्माची मुलगी वामिकाचा पहिला फोटो समोर, नेटकरी म्हणतात… ही तर सेम ‘विरूष्का’ची कॉपी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें