शरद पवार गटाकडून ‘या’ आमदारांना फोन, काय दिला संदेश

| Updated on: Jul 13, 2023 | 11:41 AM

Ajit Pawar and Sharad Pawar : शरद पवार यांच्या गटाकडून काही आमदारांना फोन केले जात आहे. या आमदारांना फोन करुन महत्वाचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटात पुन्हा रस्सीखेच होणार आहे.

शरद पवार गटाकडून या आमदारांना फोन, काय दिला संदेश
इथेच काका-पुतण्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Follow us on

योगेश बोरसे, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी मोठी घटना घडली. या घटनेमुळे राज्यातील राजकारणात भूकंप झाला. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत सरळ आपला वेगळा गट तयार केला. या गटातील ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ २ जुलै रोजी घेतली. या सर्व घडामोडी सुरु असताना अजित पवार यांच्याबरोबर किती आमदार आहेत? हा प्रश्न विचारला जात होता. त्यावेळी अजित पवार यांच्या गटाकडून ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार द्विधा मनस्थितीत आहेत. त्यांना कोणता झेंडा घेऊ मी हाती…हा प्रश्न पडला आहे.

शरद पवार गट सक्रीय

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार द्विधा मनस्थितीत आहेत. या आमदारांवर शरद पवार यांच्या गटाने लक्ष केंद्रीत केले आहे. शरद पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अजित पवार गटाच्या वाटेवर असलेल्या आमदारांना संदेश दिला जात आहे.

काय आहे संदेश

राज्यातील जे आमदार द्विधा परिस्थितीत आहेत, त्यांना फोन केले जात आहे. ठोस भूमिका घ्या, संघर्षाची भूमिका ठेवा, योग्य निर्णय घ्या विचार करून कळवा, हा निरोप आमदारांना देत आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शरद पवार गट करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना किती यश येईल, हे लवकरच स्पष्ट होईल. परंतु काठावर असलेल्या आमदारांना शरद पवार गटात आणण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहे, हे यामुळे स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांत स्पष्ट होणार भूमिका

अजित पवार यांच्या गटातील नऊ जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यानंतर अजून काही जणांना मंत्री होण्याची आशा आहे. यामुळे सत्तेत राहण्याचा प्रयत्न काही आमदारांकडून आहे. द्विधा मनस्थितीत असणाऱ्या आमदारांनी यामुळे अजून ठोस भूमिका घेतली नाही. परंतु काही दिवसांत त्यांची ही भूमिका स्पष्ट होणार आहे.