Pimpri-Chinchwad | पिंपरीत वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 1 हजारहून अधिक वाहनचालकांवर कारवाई

| Updated on: Mar 05, 2022 | 12:07 PM

फेब्रुवारी महिन्यात 1 हजार 239 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 1 हजार 998 चारचाकी वाहनांवर दंडात्मक करण्यात आली आहे. या कारवाईतून सुमारे 18 लाख 9000 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. वाहन धारकांनी वेग मर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे.

Pimpri-Chinchwad | पिंपरीत वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 1 हजारहून अधिक वाहनचालकांवर कारवाई
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पिंपरी – वाहतुकीच्या नियमांचे(Traffic Rule )  पालन न करता अतिशय वेगानं वाहने चालविल्याने अनेकदा अपघात (accidents)  घडताना दिसतात. बेधुंद पद्धतीने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर परिवहन कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सातत्याने वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 1 हजार 239 कार चालकांवर पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन (Pimpri-Chinchwad Sub Regional Transport) कार्यालयाने कारवाई करत दंड आकाराला आहे. पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकांनी, इंटरसेप्टर वाहनांत बसविण्यात आलेल्या स्पीडगनच्या पुणे-नाशिक व पुणे मुंबई महामार्गांवर ठरवून दिलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

18 लाखाहून अधिक दंड वसूल
फेब्रुवारी महिन्यात 1 हजार 239 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 1 हजार 998 चारचाकी वाहनांवर दंडात्मक करण्यात आली आहे. या कारवाईतून सुमारे 18 लाख 9000 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. वाहन धारकांनी वेग मर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. अनेक वेळा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहन चालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अतुल आदे यांनी केली आहे.

बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई
याबरोबरच बेकायदेशीररित्या दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या जवळपास 20 दुचाकीस्वरांवरही परिवहन विभागाने कारवाई केली आहे. कारवाई अंर्तगत एकूण 1 लाख 46 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर संबंधितांच्या दुचाकी स्वरांचे नोंदणी प्रमाणपत्राचे निलंबन देखील केले आहे. यानंतर अश्या प्रकारच्या कारवाया केल्या जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महामार्गांवर वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्याने होणाऱ्या अपघातांचे तसेच अपघाती मृत्यूंचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रस्ता सुरक्षा तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोणातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकामार्फत वेळोवेळी कारवाई केली जाते.

नातेवाईकांच्या साखरपुड्याला जाताना बाईक अपघात, पित्यासह लहान मुलाचाही मृत्यू

महिलांपेक्षा पुरूषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण अधिक, कारण तुम्हाला माहिती आहे का ?

क्रुझ ड्रग्जप्रकरणात कोणते मंत्री, आमदार होते याचा तपास करा, मी पुरावे देतो, मोहित कंबोज यांचा पोलीस आयुक्तांना आवाहन