राधा पाटीलनंतर मुंबईच्या प्रसिद्ध डान्सरवर गुन्हा दाखल, कोण आहे ती नृत्यांगना?

राधा पाटील हिच्यानंतर आता निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 जणींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दहीहंडीमधील अश्लील डान्स प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

राधा पाटीलनंतर मुंबईच्या प्रसिद्ध डान्सरवर गुन्हा दाखल, कोण आहे ती नृत्यांगना?
| Updated on: Sep 09, 2026 | 5:29 PM

पुण्यात दहीहंडी उत्सवादरम्यान अश्लील गाण्यांवर नृत्य करणाऱ्या नृत्यांगना आणि आयोजकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कार्यक्रमांमध्ये अश्लील डान्स आणि हावभाव करणाऱ्या डान्सर महिलांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात येत आहे. अशात आता पुण्यात अनेक ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

मात्र, अशातच आता पुण्यातील सहकारनगर परिसरात दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान आक्षेपार्ह गाण्यांवर नृत्य केल्याप्रकरणी प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील हिच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच प्रकरणात आणखी आठ नृत्यांगनांविरोधात पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कोणा-कोणावर गुन्हा दाखल?

यामध्ये निशा मुंबईकर, शुभांगी थोरात यांच्यासह अन्य नृत्यांगनांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी अश्लील नृत्य आणि आक्षेपार्ह गाण्यांना परवानगी देणाऱ्या आयोजकांवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

दहीहंडीतील कार्यक्रमांवर पोलिसांची नजर

दहीहंडी हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि उत्साहात साजरा होणारा सण आहे. मात्र उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अश्लील गाणी, आक्षेपार्ह नृत्य किंवा अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रत्येक ठिकाणी पोलिसांकडून विशेष लक्ष दिलं जात आहे.

पुण्यातील दहीहंडी कार्यक्रमादरम्यान काही नृत्यांगनांनी आक्षेपार्ह गाण्यांवर नृत्य केल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकाराची दखल घेत सहकारनगर पोलिसांनी संबंधितांवर डान्सर आणि आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

राधा पाटीलनंतर कारवाईचा विस्तार

या प्रकरणात राधा पाटील हिच्यावर आधीच गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आणखी आठ नृत्यांगनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे दहीहंडी कार्यक्रमांमध्ये मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलता किंवा आक्षेपार्ह सादरीकरण करणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधित व्यक्तींची भूमिकाही तपासली जात असून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. यासोबत गौतमी पाटीलच्या डान्सबाबत देखील काही ठिकाणी तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us