AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्थमंत्रीपद राहिल की नाही माहीत नाही; अजितदादा यांचं धक्कादायक विधान; पडद्यामागे पुन्हा हालचाली?

राहुल नार्वेकर निष्णांत वकील आहेत. त्यामुळे आमदार अपात्रतेवर योग्य तो निकाल ते देतील. आमच्याकडे 225 आमदारांचं बळ आहे. त्यामुळे सरकारला धोका नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

अर्थमंत्रीपद राहिल की नाही माहीत नाही; अजितदादा यांचं धक्कादायक विधान; पडद्यामागे पुन्हा हालचाली?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2023 | 1:46 PM
Share

नाविद पठाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बारामती | 24 सप्टेंबर 2023 : भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल दिवसभर मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हते. अजित पवार यांनी मुद्दामहून मुंबईत राहणं टाळलं का? अशी चर्चा काल दिवसभर सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांचं एक मोठं विधान आलं आणि पुन्हा चर्चांना उधाण आलं. अजित पवार यांनी थेट त्यांच्या अर्थ खात्याशी संबंधित विधान केलं आणि राजकीय वर्तुळाला कामाला लावले. अजितदादांच्या विधानाचा उलटसुलट अर्थ काढला जात असतानाच दुसरीकडे भाजपला त्यावर सावरासावर करताना दमछाक झाली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना अजितदादा यांनी हे विधान केलं. आपल्या संस्था ताकदवान झाल्या पाहिजे. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे. आज अजित पवार मंत्रिमंडळात आहे. हातात अर्थ खातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण हे पुढे टिकेल की नाही माहीत नाही. पुढचं कुणी पाहिलं नाही, असं अजित पवार म्हणाले. अजितदादा यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

तर दोन पळ्या जास्त मिळतात

75 टक्के बारामती झोपलेली असते. तेव्हा मी कामाला सुरुवात करतो. माझ्या दौऱ्यामुळे लोकांना त्रास होवू नये हा उद्देश असतो. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे उपमुख्यमंत्री, अर्थ खाते माझ्याकडे आले. सर्व खात्यांना निधी देण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. 288 मतदारसंघात निधी देतोच. पण वाढप्या ओळखीचा असेल तर बारामतीकर दिसल्यावर दोन पळ्या जास्त पडतात. अधिकाधिक चांगलं बारामतीकरांना देण्याचा प्रयत्न करत आहे, असं अजित पवार म्हणाले.

ते नैसर्गिक विधान

दरम्यान, अजित पवार यांच्या या विधानावर भाजपने सारवासारव सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भविष्यात काय होईल कुणालाही माहिती नाही. अजित पवाराचं हे वक्तव्य नैसर्गिक आहे. ते राजकीय विधान नाही. उद्या काय होईल हे तुम्ही तरी सांगू शकता का? तेच अजितदादांनी सांगितलं, अशी सारवासारव चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

मीही काल जाऊ शकलो नाही

अजितदादा शाह यांच्या दौऱ्यात गैरहजर होते, त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवारांच्या बारामतीतील पाच संस्थाच्या बैठका पूर्वनियोजीत होत्या. त्यामुळे त्यांना येता आलं नाही. त्यांनी तसं कळवलं होतं. मीही काल नागपूरातील पूरामुळे जावू शकलो नाही. पण मी कळवलं होतं. गोंधळ निर्माण करण्याची गरज नाही, असं बावनकुळे म्हणाले.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत