Ajit Pawar : अजित पवार म्हणतात…आता अजिबात चुकणार नाही, धरणाबाबतचं वक्तव्य पुन्हा आठवलं

| Updated on: Jun 03, 2022 | 5:48 PM

बोलता बोलता कधी गाडी पटरीवरून (Ajit Pawar Controversy) खाली घसते हे अजित पवारांच्याही लक्षात येत नाही आणि हे एकदाच नाही झालं. तर अनेकदा झालं आहे. मात्र आज अजित पवारांना हेच आठवलं आणि अजित पवारांनी आता बोलताना कधीच चुकणार नाही, असा ध्यास घेतला आहे.

Ajit Pawar : अजित पवार म्हणतात...आता अजिबात चुकणार नाही, धरणाबाबतचं वक्तव्य पुन्हा आठवलं
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : अजित पवारांची (Ajit Pawar) भाषणं म्हणजे कार्यकर्त्यांसाठी मेजवाजीनच असतात. अजित पवार बोलायला लागले की टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा कडकडा ऐकायला येतो. अजित पवार कधी बोलताना स्टेजवरूनच (Ajit Pawar Speech) कार्यकर्त्यांना थेट मोकळेपणे झापतात. तर कधी अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. तर कधी विरोधकांना आता तू कसा निवडून येतो ते बघतोच म्हणत भर सभेतून थेट चॅलेंज देतात आणि ते चॅलेंज पूर्णही करून दाखवतात. अजित पवारांची विधानसभेतलीही अनेक भाषण गाजलेली आहेत. विधानसभेतही ते थेट विरोधकांना आता चुकीला माफी नाही…असे विनोदी स्टाईलने म्हणताना दिसून येतात. मात्र बोलता बोलता कधी गाडी पटरीवरून (Ajit Pawar Controversy) खाली घसते हे अजित पवारांच्याही लक्षात येत नाही आणि हे एकदाच नाही झालं. तर अनेकदा झालं आहे. मात्र आज अजित पवारांना हेच आठवलं आणि अजित पवारांनी आता बोलताना कधीच चुकणार नाही, असा ध्यास घेतला आहे.

आज पुण्यात काय झालं?

त्याचं झालं असं अजित पवार पुण्यात बोलत होते, त्यावेळी कार्यकर्ते टाळ्या वाजवत होते, मात्र बोलताना अजित पवार म्हणाले. आता चुकायचं नाही,बाबानो लय खबरदारी घेतोय,माग एकदा मी चुकलो होतो तर सकाळी 7 पासून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळावर बसलो,म्हणून आता चुकायचं नाही, असे म्हणतातच टाळ्यांचा कडकडाट झाला तर त्यावरही अजित पवार म्हणतात, तुम्ही कितीही टाळ्या वाजवल्या तरी मी काही बोलणार नाही, कार्यकर्त्यांनी कौतुक केलं की नेते भावनेच्या भरात चुकीचं बोलून जातात, मी मात्र माझ्या दुसऱ्या मनाला सांगत असतो चुकायच नाही…..चुकायच नाही…..चुकायच नाही….. अस म्हणत असतो, अजित पवारांनी असे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा हशा पिकला.

हे सुद्धा वाचा

अनेक विधानं वादात

धरणात पाणी सोडण्यावरून अजित पवारांनी केलेलं वक्तव्य लोक आजही विसले नाहीत. तसेच मागे काही दिवसांपूर्वीच बोलताना अजित पवार भरणेंना उद्देशून म्हणाले जिल्ह्यांचा निधी त्यांच्या हातात आहे. मात्र राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत, मीच निधी नाही दिली तर काय देणार घंटा? अशी अजित पवारांनी अनेक वक्तव्य मागे वादत राहिली आहेत. आणि अशाच वक्तव्यांमुळे त्यांच्यावर आत्मचिंतन करण्याचीही वेळ आली आहे. त्यामुळे आता अजित पवार जपून बोलणार असे बोलताना दिसून येताहेत, आता हा ध्यास काय टिकणा का? की मध्येच गाडी पुन्हा पटरीवरून उतरणार हे काही दिवसात कळेलच…