Ajit Pawar : यांचा राडा पाहून हनुमानही डोक्यावर हात मारून घेत असेल, अजित पवारांचा भांडखोर महंतांना टोला

याच वादावर आता राष्ट्रवादीचे बेधडक नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुफान फटकेबाजी केलीय. त्यांनी या हमरातुमरीवरून साधू, महंतांना चिमटे काढले आहेत.

Ajit Pawar : यांचा राडा पाहून हनुमानही डोक्यावर हात मारून घेत असेल, अजित पवारांचा भांडखोर महंतांना टोला
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Image Credit source: social media
दादासाहेब कारंडे

|

Jun 03, 2022 | 5:04 PM

पुणे : राज्यात सध्या वादांवर वाद आणि धार्मिक वाद (Political Dispute) सुरू असतानाच काही दिवसांपूर्वीच नवा वाद पेटाल तो म्हणजे हनुमानाच्या जन्मस्थळाचा (Hanuman Birth Place), कारण एक साधुंचा गट म्हणतो हनुमानाचा जन्म हा किष्किंधामध्ये झाला तर दुसरा गट म्हणतो की अंजनेरी येथे हनुमाचा जन्म झाला. त्यावरून नाशिकमध्ये अयोजित परिषदेत जोरदार राडाही झाला. अगदी सादू महंत एकमेकांवर धावून गेले. हे प्रकरण अगदी माईक उगारण्यापर्यंत गेलं. याच वादावर आता राष्ट्रवादीचे बेधडक नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुफान फटकेबाजी केलीय. त्यांनी या हमरातुमरीवरून साधू, महंतांना चिमटे काढले आहेत. यांचं हे रुप आणि हे वागणं बघून हनुमानानेही कपाळावर हात मारून घेतला असेल, असे वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे.

…आणि आपण यांना यांना महंत म्हणतो

साधू, महंतांचा स्वभाव हा शांत असतो, महंतांनी गप्प बसावं तर हे ते माइक घेऊन मारताहेत एकमेकांना आणि आपण त्यांना महंत, महाराज म्हणतो, असा टोला अजित पवारांनी लगावाला आहे. तसेच यांचा हा राडा पाहून हनुमान सुद्धा डोक्याला हात मारून घेत असेल अरे हा काय प्रकार आहे, कोण म्हणतोय मारुती इथं जन्मला तर कोण म्हणतं इथे जन्मलो, अरे तुम्हाला शनिवार दर्शनाला जायचे आहेच ना आणि महंत महंत म्हणता आणि माईक घेऊन मारायला उठताय , असे म्हणत अजित पवारांनी या वादावर फटकेबाजी केली आहे. त्यामुळे अजित पवार हा त्यांच्या स्टाईलनं समाचार घेताना पुन्हा एकदा दिसून आले.

कुणी कुठेही जायचं आणि हनुमान चालीसा म्हणायचं

तसेच मतोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरणाऱ्या राणा दाम्पत्यालाही अजित पवारांनी पुन्हा टोलेबाजी केली आहे. काही व्यक्ती संस्था,संघटनांकडून जातीच्या धर्मच्या नावनं विष पेरणं सुरू आहे,शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला , कोण आहेत या शक्ती? कुणाचा हात यामागे आहे? असा सवाल त्यांनी केला आहे तर कुणीही उठायचं आणि कुठं जायचं आंही हनुमान चालीसा म्हणायचं, मी जर म्हणलो भोसरीत जाऊन अजित गव्हाणेंच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणणार तर चालेल का? मला माझं काठेवाडीच घर आहे,फारफार तर मुंबई मधील देवगिरीच घर आहे, तिथं हनुमान चालीसा म्हणता येईल, कुणालाही आपल्या कृती मुळे त्रास होताकामा नेये, असे म्हणत अजित पवारांनी पुन्हा त्या प्रकरणाचा समाचार घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें