अमित शहांचा दौरा, पुण्यनगरीत त्या बॅनरची रंगली चर्चा, काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड, पेपर लीकवर बोलणार? सर्वांचे लक्ष

Amit Shah in Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येत आहे. CJP आंदोलनानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्यांच्या दौर्‍याला विरोध केला आहे. त्याचवेळी पुणे शहरातील अनेक भागात दोन्ही बाजूंनी बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर अमित शहा हे पेपरफुटी आणि आंदोलकांवरील लाठीहल्ल्यावर बोलतील का याकडे लक्ष लागले आहे.

अमित शहांचा दौरा, पुण्यनगरीत त्या बॅनरची रंगली चर्चा, काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड, पेपर लीकवर बोलणार? सर्वांचे लक्ष
अमित शाह पुणे दौरा
| Updated on: Aug 01, 2026 | 9:45 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रोहित टिळक यांच्या लोकमान्य टिळक ट्रस्ट कडून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमित शहा ज्या हॉटेल मध्ये मुक्कामी आहेत त्या हॉटेल बाहेर पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॉटेल रिटज कार्लटन हेरिटेज येथे दाखल झाले आहेत. NEET पेपरफुटी आणि जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवर ते बोलतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे.

बॅनरची रंगली मोठी चर्चा

अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी पुण्यात त्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. भारताचे चाणक्याचे शौर्यभूमीत स्वागत अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे. तर काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही विरोधातील बॅनर लावले आहेत.’तुमचे ते लेकरू आणि आमचं ते कार्ट’ अशा आशयाचे उपरोधिक बॅनर लागले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यांनी अमित शहा यांना विरोध केला आहे. काही बॅनर्स हटवण्यात आल्याचे समजते. काल खासदार संजय राऊत यांनीही अमित शहा यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताब्यातील वाहनांची डॉग स्कॉड करून तपासणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कारावे सन्मानित करण्यात येणार आहे हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे यासाठी अमित शहा हे रात्री पुण्यात दाखल झालेत ज्या हॉटेलमध्ये ते मुक्कामी आहेत ज्या हॉटेलमधून ते पुण्याच्या दिशेने निघणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्या ताफ्यातील वाहनांची तपासणी पुणे पोलिसांच्या डॉग्स स्कॉड, बॉम्बशोधक पथकाकडून सुरू आहे.

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड

काल रात्री पासून १०० ते १५० कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे. तीन दिवसांपासून पोलीस त्रास देत आहेत. त्यांना नोटीस दे , उचलून घेवून जाणे, असे प्रकार सुरू आहेत. भाजप पोलिसांचा वापर करत आहे. ते आम्हाला घाबरले आहेत. ते म्हणत होते की आंदोलन होणार नाही पण आता आंदोलन होत आहे. टिळक परिवार ज्यांच्या हातातून पुरस्कार देत आहे. त्यांच्या काळात क्रूर अन्याय अत्याचार होत आहे. इथून पुढे तर त्यांनी काळजी घ्यावी.

अमित शहा यांच्या दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध करण्यात येत आहे. अमित शहाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला निषेध आंदोलन करणार आहे. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकार्‍यांची धरपकड सुरू आहे. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. तर चौकशीसाठी डेक्कन पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं आहे.

काँग्रेसला जशास तसे उत्तर दिले जाणार

काँग्रेसला जशास तसे उत्तर दिले जाणार आहे. आज सकाळी 9 वाजता अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ भाजपचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. काँग्रेस ज्या ठिकाणी आंदोलन करणार त्या परिसरात आमचे भाजपचे कार्यकर्ते उपस्थित राहणार. काँग्रेसचे अर्धे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आडमुठी भूमिका घेऊ नये. पुणे पोलिसांनी त्यांची भूमिका योग्य पद्धतीने पार पाडावी. शेकडो पोलीस इथे आले आहेत जर त्यांनी जर आडकाठी आणली तर आम्ही तीव्र आंदोलन करू असे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us