खेडमध्ये महिलेची सरपंच पदावर निवड होताच ; गुलाल उधळत अन जेसीबीतून काढली मिरवणूक

दावडी ग्रामपंचायचे माजी संभाजी घारे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी राणी सुरेश डुंबरे पाटील यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच पदावर नियुक्ती होताच कुटुंबीयांनी जेसीबीमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

खेडमध्ये महिलेची सरपंच पदावर निवड होताच ;  गुलाल उधळत अन जेसीबीतून  काढली मिरवणूक
सरपंच पदावर निवड होताच जेसीबीतून काढली मिरवणूक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 2:22 PM

पुणे –पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना वेग आला आहे. खेड तालुक्यातील दावडी(Dawadi) ग्रामपंचायत सरपंच पदावर राणी डुंबरे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच(Sarpanch) पदावर निवड झाल्यावर राणी डुंबरे याची चक्क जेसीबीमधून(JCB)  मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी गुलालाची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आली आहे .खेड तालुक्यातील पूर्व भागातील दावडी गाव हे मोठे ऐतिहासिक गाव आहे. 13 सदस्य असलेली ग्रामपंचायत  आहे.

अशी झाली निवड

दावडी ग्रामपंचायचे माजी संभाजी घारे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी राणी सुरेश डुंबरे पाटील यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच पदावर नियुक्ती होताच कुटुंबीयांनी जेसीबीमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्याचाच बबरोबर ढोल – ताशा वाजता मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळणंही करण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांसह महिलाही यामध्ये सहभागी झालया होता. दोन दोन जेसीबीमध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्याना बसवून, त्यांच्यावर गुलालीची उधळण करण्यात आली होती. जेसीबीवरील ही मिरवणूक आजूबाच्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Summer drink: कडक उन्हापासून वाचण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा, शुगर वाढण्याचीही भीती नाही!

YAVATMAL मध्ये खाणीतील धुळीने पीक काळवंडली, शेतकरी चिंतेत; आंदोलनाचा इशारा

शिवसेनेने हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली, Uddhav Thackeray उद्या ‘आयसीस’शीही चर्चा करतील; नितेश राणेंची टीका