AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Airport : आंतराराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदरच्या जागेला संरक्षण विभागाचा नकार, भाजप आमदारांचा नव्या जागेचा प्रस्ताव

पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची मान्यता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने रद्द केली. त्यामुळे आता नव्याने जागेचा शोध घेताना पिंपरी-चिंचवडलगतच्या खेड तालुक्यातच विमानतळ व्हावे, अशी मागणी जोर धरू लागलीय.

Pune Airport : आंतराराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदरच्या जागेला संरक्षण विभागाचा नकार, भाजप आमदारांचा नव्या जागेचा प्रस्ताव
महेश लांडगे , भाजप आमदार
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 8:55 AM
Share

पुणे: पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची मान्यता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने रद्द केली. त्यामुळे आता नव्याने जागेचा शोध घेताना पिंपरी-चिंचवडलगतच्या खेड तालुक्यातच विमानतळ व्हावे, अशी मागणी जोर धरू लागलीय. नवीन प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉजिस्टिक विमानतळ खेड तालुक्यातच झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

महेश लांडगे काय म्हणाले?

पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यात प्रस्तावित होतं. आता पुरंदरची मान्यता संरक्षण विभागानं रद्द केलीय. त्यामुळं आंतराराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यात व्हावं यासाठी राजकारणविरहित प्रयत्न करणार असल्याचं महेश लांडगे म्हणाले. दोन्ही खासदार यांच्याकडे हा विषय मांडून पाठपुरावा करणार असल्याचं महेश लांडगे म्हणाले.

खेडमध्ये विमातनळ येणं फायदेशीर

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील तळेगाव-चाकण-रांजणगाव येथील इंडस्ट्रिअल हब आणि पिंपरी-चिंचवडमधील रेसिडेन्सिअल कॉरिडॉरच्या दृष्टीने भविष्यातील 25 वर्षांचा विचार करता खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावे, अशी आमची आग्रही मागणी असल्याचं महेश लांडगे म्हणाले. खेड आणि पिपंरी चिंचवड परिसरातील वाढत्या औद्योगिक वसाहतीमुळं खेड तालुक्यातील विमानतळ फायदेशीर ठरेल, असं महेश लांडगे म्हणाले.

पुरंदरच्या प्रस्तावित जागेस संरक्षण विभागाचा नकार

पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या जागेस संरक्षण विभागानं नकार दिला आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी ट्‌विटद्वारे ही माहिती दिली होती., नव्या जागेत पुरंदरमधील पाच गावे आणि बारामतीमधील तीन गावांचा समावेश होता. याबाबतचा प्रस्ताव संरक्षण विभागाला मान्यतेसाठी पाठविला होता. मात्र, त्यास संरक्षण विभागाने विविध कारणे दाखवित ना हरकत प्रमाणपत्र रद्द केले आहे.

इतर बातम्या:

Pune International Airport | पुणेकरांचे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न पुन्हा लांबणीवर ; नवीन जागेबाबत संरक्षण विभागाने दिला ‘हा’ निर्णय

Pune Corona alert |पुण्यात कोरोना वेगाने पसरतोय ; आठवड्यात रुग्णसंख्येत तिप्पट वाढ ; जम्बो कोविड सेंटर सज्ज

BJP MLA Mahesh Langde demanded to build Pune International Airport in Khed after permission cancel of Purndar

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.