Rajgurunagar loudspeaker : भोंग्याविना झाली अजान; पुण्यातल्या राजगुरूनगरातला आदर्श, गुड मॉर्निंग पथक ठेवतंय लक्ष

| Updated on: May 04, 2022 | 10:15 AM

गुड मॉर्निंग स्क्वॉडमध्ये साधारण दोन पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली आहे. पहाटे चार वाजल्यापासून सतीश गुरव एका पथकाद्वारे तर दुसऱ्या पथकात दुसरे पोलीस निरीक्षक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Rajgurunagar loudspeaker : भोंग्याविना झाली अजान; पुण्यातल्या राजगुरूनगरातला आदर्श, गुड मॉर्निंग पथक ठेवतंय लक्ष
तेलंगणा सरकारचा मोेठा निर्णय
Image Credit source: tv9
Follow us on

राजगुरूनगर, पुणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या 4 तारखेच्या अल्टिमेटमनंतर पोलीस यंत्रणा रात्रीपासूनच अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिद आणि मंदिरावरील भोंगे परवानगी घेऊनच वाजविण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार आज पहिल्यांदाच राजगुरूनगर (Rajgurunagar) येथील मशिदीवरील पहाटेची पहिली अजान ही भोंग्याविना पठण करण्यात आली. यावेळी मशिदीबाहेर पोलिसांच्या तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळांच्या तपासणीसाठी गुड मॉर्निंग पथक (Good morning squad) तैनात करण्यात आले आहे. त्या माध्यमातून सर्व ठिकाणी शांतता राहील, याची काळजी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. राजगुरूनगर हा ग्रामीण भाग आहे. त्यादृष्टीकोनातून येथील ग्रामीण पोलीस सध्या धार्मिक स्थळांची तपासणी करत आहेत. तसेच अनुचित प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घेत आहेत.

गुड मॉर्निंग पथकाद्वारे तपास

गुड मॉर्निंग स्क्वॉडमध्ये साधारण दोन पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली आहे. पहाटे चार वाजल्यापासून सतीश गुरव एका पथकाद्वारे तर दुसऱ्या पथकात दुसरे पोलीस निरीक्षक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. हद्दीतील सर्व धार्मिक स्थळे मग ती हिंदुंची असो की मुस्लीम समाजाची. प्रत्येक ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी असल्याची खात्री करण्यात येत आहे. तर बहुधा सर्वांनीच परवाने घेतले असल्याची माहितीही गुरव यांनी दिली आहे. राजगुरूनगरात भोंग्याविनाच अजान होत असल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक सतीश गुरव म्हणाले आहेत.

न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसार अजान आणि काकड आरती

परवान्यानुसार रात्री दहापासून सकाळी सहापर्यंत कोणीही लाऊडस्पीकरचा वापर करणार नाही, अशी अट आहे. त्याप्रमाणे अजाण असेल किंवा काकड आरती ध्वनीक्षेपकाच्या वापर करता येत नाही. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेपेक्षा अधिक आवाजही करता येत नाही, असे गुरव यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राजगुरूनगरातील मशिदीत लाऊडस्पीकरविना अजाण झाल्याचेही सतीश गुरव यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले पोलीस निरीक्षक सतीश गुरव?