AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा वेगळा पाडवा का? पवार कुटुंबात फूट?; पार्थ पवार म्हणाले, आता इथून पुढे…

Parth Pawar on Diwali Padwa 2024 : बारामतीत यंदा परंपरे प्रमाणे दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. परंतू दोन वेगवेगळ्या ठिकाणी पवार कुटुंबिय दिवाळीचा पाडवा साजरा करत आहेत. शरद पवार गोविंद बागेत कार्यकर्त्यांना भेटत आहेत. अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत आहे. वाचा...

यंदा वेगळा पाडवा का? पवार कुटुंबात फूट?; पार्थ पवार म्हणाले, आता इथून पुढे...
पवार कुटुंबImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 02, 2024 | 10:30 AM
Share

अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. शरद पवार आणि अजित पवार या दोन गटांमध्ये राष्ट्रवादी पक्ष विभागला गेला. राजकीय पातळीवर सुरु असलेला हा संघर्ष आता कौटुंबिक पातळीवर देखील पाहायला मिळत आहे. इथून मागे पवार कुटुंब एकत्र दिवाळी सण साजरा करायचं. पाडव्याला शरद पवार यांच्या बारामतीतील ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी होत असत. मात्र आता यंदा पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवा साजरा केले आहेत. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

यंदा वेगळा पाडवा का?

दोन दिवाळी पाडवा आता इथून कायम राहणार आहेत. कार्यकर्त्यांची भावना होती की आपण वेगळा पाडवा करायला पाहिजे. त्यानुसार अजितदादांनी निर्णय घेतला. आपण आता हे कायम करणार आहोत. एकत्र पाडवा केला असता तर जनतेत संभ्रम निर्माण झाला असता. दोन पक्ष आणि एकत्र येतात हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे. त्यांचा आणि आमचा पक्ष आता वेगळा आहे. त्यामुळे इथून पुढे हे दोन पाडवे साजरे होणार आहेत, असं पार्थ पवार म्हणाले.

पवार कुटुंबात फूट?

दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाडवा साजरा केला जात असल्याने पवार कुटुंबात फूट पडली आहे का? यावर चर्चा होत आहे. यावरही पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  आम्ही इथून पुढे पाडवा वेगळा करणार असलो तरी मात्र कुटूंब म्हणून आम्ही एकच आहोत. जेव्हा काही फॅमिली कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही एकत्र येऊ. पण आता आमचे राजकीय विचार वेगळे आहेत. कधी जुळणार नाहीत, असं पार्थ पवारांनी स्पष्टपणे सांगितलं. मी शरद पवार यांना भेटायला नेहमी जातो. यावेळी पण जाणार आहे. मोठ्या लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी जायला पाहिजे, असंही ते म्हणालेत.

युगेंद्र पवारांना दिलेली उमेदवारी आम्हाला आवडलेली नाही. मात्र आता सामोरं जावं लागणार आहे. हे आता कायम असणार आहे. हे थांबायला पाहिजे होतं. मात्र आता थांबणार नाही. एकत्र येणायासाठी आपण प्रयत्न केलेत. मात्र यश आलं नाही, आता विषय सोडला आहे, असंही पार्थ म्हणाले.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स