नवाब मलिक डी गँगशी संबंधित असतील तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न, चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केली गंभीर शंका

| Updated on: Feb 23, 2022 | 3:29 PM

नवाब मलिक जर दोषी असतील तर कारवाई करा अशी मागणी आम्ही करणारच, कारण जर मलिक डी गँगशी संबंध असतील तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अशी गंभीर शंक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित केली आहे.

नवाब मलिक डी गँगशी संबंधित असतील तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न, चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केली गंभीर शंका
chandrakant Patil
Follow us on

पुणे : महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी (ED) भजापच्या इशाऱ्यावरून कारवाई करते. असा आरोप मगील काही दिवसांपासून संजय राऊत सतत करत आहेत. महाविकास आघाडीनेही हीच भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुडाचे राजकारण सुरू आहे म्हणत भाजपवर टीका केली आहे. अशातच मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या ईडी चौकशीने राजकारण तापवलं आहे. यावर दोन्ही बाजुने आता जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. भाजप सुड्याच्या भावनेतून कारवाई करत आहे. असा आरोप महाविकास आघाडी करत आहे, तर नवाब मलिक दोषी नसतील तर त्यांनी कोर्टात जावं असे भाजप नेते सांगत आहेत.मात्र नवाब मलिक जर दोषी असतील तर कारवाई करा अशी मागणी आम्ही करणारच, कारण जर मलिक डी गँगशी संबंध असतील तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अशी गंभीर शंक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित केली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

हा गौप्यस्फोट करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 1993 च्या बॉम्बस्फोटातील नरसिंह राव यांचा अहवाल अजून बाकी आहे. हा बाहेर आल्यास आज जे बोलत आहेत त्यांची बोलती बंद होईल. मात्र जर तुम्हाला राजकीय सूडबुद्धीने कारवाई वाटत असेल तर न्यायालयात जा, तिथे तुम्हाला योग्य न्याय मिळेल, असा खोचक टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या आरोपावर बोलताना, विरोधी पक्षांनी असचं म्हणायचं असतं. त्यांनी म्हटल्या बद्दल त्यांचं अंभिनंदन व्हायला पाहिजे. अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर आधी यांनी आमच्यावर टीका केली. नंतर कोण देशमुख ? असे वागू लागले. त्यामुळे विरोधकांचा आरोपचा आवाज हळूहळू क्षीण होत जातो आहे. तसेच या प्रकरणात चौकशी सुरू असल्यामुळे आधिक बोलणं योग्य नाही. तुम्ही न्यायालयाचे दार ठोठवा, तसेही तु्म्ही अनेक केसेस हरले आहात आसा टोला त्यांनी लगावला आहे.

अमोल मिटकरी यांचाही हल्लाबोल

आज ईडीच्या कार्यालयात कुठलीही नोटीस नसताना अनधिकृत त्यांना पाठवलं. पवार साहेबांनी काही मिनिटांपूर्वी स्टेटमेंट दिले की हे होणारच होतं. ज्या पद्धतीने भाजपचा बुरखा नवाब मलिक फाडणार होते. त्याच्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. यांनी मराठा नेते संपवले , यांनी ओबीसी नेते संपवले आणि आता हे मुस्लिम नेत्यांना संपवायला लागले आहेत. त्यामुळे आता भाजप शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत आहे. भाजप वाले पळकुटे आहेत ते आता घाबरले आहेत..त्यामुळे येणाऱ्या काळात “भाजाप को करारा जवाब मिलेगा” अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Aurangabad | दहा हजारांची लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर कारवाई, औरंगाबाद महानगर पालिकेतील प्रकार

तपास यंत्रणांना जेवढे अधिकार, तेवढ्याच मर्यादाही! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वकील माजिद मेमन यांचा इशारा!

Ashish Shelar on Nawab Malik | ‘पवारसाहेब मोठे नेते, त्यांना आम्ही काय सांगणार! पण…’