मुंबईकर शिवसेनेला महापालिका निवडणुकीत जागा दाखवून देतील: चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.

मुंबईकर शिवसेनेला महापालिका निवडणुकीत जागा दाखवून देतील: चंद्रकांत पाटील
chandrakant patil
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 11:33 AM

पुणे: हजारो कोटींचा खर्च करूनही मुंबईतील नालेसफाईचा प्रश्न सुटत नाही. मी सुद्धा काल मुंबईत अडकलो होतो. मुंबई तुंबई होतेय हे खरं आहे, असं सांगतानाच येत्या पालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. (chandrakant patil slams shivsena over waterlogging in mumbai)

चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी नेहमी काही तरी वेगळं करत असतो. रिक्षाचालकांना कुपन, रेशन किट वाटप केले. तीन हजार लोकांना हे वाटप केलं. वंचित घटकांसाठी मोफत लसीकरण सुरू केलं आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यात भाग घेतला आहे, असं पाटील म्हणाले.

कोरोना बळींची संख्या लपवली

राज्यातील कोरोना बळींची संख्या लपवली जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मृत्यूची संख्या जाहीर झालेली असताना त्यात एक लाख मृत्यूंचा फरक आहे. देशात राज्याचा वन थर्ड फरक आहे, असंही ते म्हणाले.

त्या बैठकीवर मौन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची बैठक झाली. त्यात स्थानिक पातळीवरील निवडणुकीत मोदींचा फोटो न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यावर बोलण्यास पाटील यांनी टाळले. माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती आहे. त्याबद्दल आनंद वाटला. मला याबाबत काहीच माहीत नाही, असं बोलून पाटील यांनी अधिक भाष्य करणं टाळलं.

आघाडीला काही करता येत नाही

आरक्षण असो की अन्य काहीही राज्यातील आघाडी सरकारला काही करता येत नाही. दहा महिने झाले. मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत. यापेक्षा वेगळं काही होणार नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली. (chandrakant patil slams shivsena over waterlogging in mumbai)

 

संबंधित बातम्या:

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, गोड माणूस चंद्रकांतदादांना शुभेच्छा : संजय राऊत

अतिवृष्टीचा इशारा, कर्जत-खालापूरमधील धबधबे, धरण आणि तलवापरिसरात जाण्यास बंदी!

मुंबईत आजही लसीकरण सुरु राहणार, ऑनलाईन अपॉईंटमेंट बूक करा, चेक करा सेंटर्सची लिस्ट

(chandrakant patil slams shivsena over waterlogging in mumbai)