मुंबईत आजही लसीकरण सुरु राहणार, ऑनलाईन अपॉईंटमेंट बूक करा, चेक करा सेंटर्सची लिस्ट

मुंबईत पावसानं धुमाकुळ घातलेला असतानाही लसीकरणात खंड पडणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे.

मुंबईत आजही लसीकरण सुरु राहणार, ऑनलाईन अपॉईंटमेंट बूक करा, चेक करा सेंटर्सची लिस्ट
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : मुंबईत पावसानं धुमाकुळ घातलेला असतानाही लसीकरणात खंड पडणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे. कारण पावसानं एक दोन दिवस दाणादाण उडेल पण लसीकरण झालं नाही तर मुंबई बंद करण्याची वेळ येऊ शकते. ती वेळ येऊ नये म्हणूनच मुंबईत आज लसीकरण सुरुच ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. पण त्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट बुक करायची आहे. त्यानंतर लस मिळणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत लसीकरण करण्यात येईल. (Mumbai Corona Vaccination Center Open Today Here The full list)

बीकेसीत काय आहे तयारी?

लसीकरणासाठी बीकेसी सेंटरला दोन भव्य मंडप उभारण्याचं काम पूर्ण केलं आहे. एकाच वेळेस हजार लोक बसू शकतील एवढी त्याची क्षमता आहे. तौक्ते वादळात आधी उभारलेल्या मंडपाची दुरवस्था झालेली होती. त्यानंतर पुन्हा नव्यानं हे दोन मंडप उभारण्यात आले आहेत.

ज्यांचं वय 18 ते 44 दरम्यान आहे त्यांना दुसरा डोस दिला जाईल. 45 च्या वरील 80 टक्के लोकांना पहिला डोस दिला जाणार, तर 20 टक्के लोकांना दुसरा डोस देण्याची तयारी आहे. ज्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे त्यांनी पहिला डोस घेतल्याचं सर्टीफिकेट सोबत आणायचं आहे.

आतापर्यंत किती लसीकरण?

मुंबईत सोमवारी आतापर्यंतचे एका दिवसातले सर्वाधिक डोस देण्यात आले. 94 हजार 941 एवढे डोस त्यादिवशी दिले गेले. विशेष म्हणजे सरकारी सेंटरपेक्षा खासगी हॉस्पिटलमध्येच सर्वाधिक लसीकरण होत आहे. जवळपास 75 टक्के लसीकरण हे प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये होतं आहे. गेल्या दहा ते 12 दिवसात जवळपास साडे चार लाख डोस हे प्रायव्हेट सेक्टरकडून दिले गेलेत तर सरकारी सेंटरमधून फक्त 1.8 लाख एवढे.

लसीकरणासाठी किती पैसे मोजताय?

केंद्र सरकारनं सर्वांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. लस देण्यासाठी सर्व्हिस फी म्हणून कोणतंही हॉस्पिटल फार फार तर दीडशे रुपये चार्ज करु शकतं. तसा नियम आहे. पण अनेक खासगी हॉस्पिटल्स दोनशे ते तीनशे रुपये सर्व्हिस चार्ज घेत असल्याच्याही तक्रारी आहेत. याबाबत संभ्रम असल्याचं काही डॉक्टरांचं म्हणणं आहे.

कोणत्या लसीची किती किंमत?

केंद्र सरकारनं सर्वांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा केली असली तरीसुद्धा खासगी दवाखाण्यात लस घ्यायची तर पैसे मोजावे लागणार. कोविशिल्डची लस घ्यायची तर 900 ते 1200 रुपये मोजावे लागत आहेत. तर कोवॅक्सिनची लस हवी असेल तर 1250 ते 1500 रुपये खर्च येतो आहे. खासगी दवाखाण्यात कोविशिल्ड लसीची किंमत ही 650 रुपये तर कोवॅक्सिनची दुप्पट म्हणजेच 1200 रुपये एवढी आहे. (Mumbai Corona Vaccination Center Open Today Here The full list)

संबंधित बातम्या :

समुद्रात भरती, वर मुसळधार पाऊस, बीएमसीच्या 6 केंद्रांच्या सलग 8 तास मेहनतीनं पूरस्थिती टाळण्यात यश

लोकल ठप्प, बसेस नाहीत, वाहतुकीची कोंडी अन् पावसाची रिपरिप; चाकरमानी म्हणतात, जाये तो जाये कहाँ!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI