VIDEO | पुण्यात प्राध्यापकांच्या विविध मागण्या, भजन करत वारकरी पद्धतीने आंदोलन

विविध मागण्यांसाठी पुण्यात उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर प्राध्यापक आंदोलन करत आहे. आज हे सर्व प्राध्यापक वारकरी पद्धतीने आंदोलन केले. (CHB Professor Protest in Pune)

VIDEO | पुण्यात प्राध्यापकांच्या विविध मागण्या, भजन करत वारकरी पद्धतीने आंदोलन
pune professor protest
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 1:27 PM

पुणे : सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समितीनं पुण्यातील उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर 21 जूनपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. प्राध्यपक भरती आणि मासिक मानधन पद्धत बंद करुन समान वेतन धोरण जाहीर करावे, या मागणीसाठी सीएचबी तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचं पुण्यात आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलकांनी वारकरी पद्धतीने आंदोलन केले आहे. (CHB Professor Protest in Pune last four days Outside the office of the Director of Higher Education in Pune)

चार दिवसांपासून आंदोलन 

विविध मागण्यांसाठी पुण्यात उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर प्राध्यापक आंदोलन करत आहे. आज हे सर्व प्राध्यापक वारकरी पद्धतीने आंदोलन केले. टाळ भजन आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत या आंदोलनला भेट देणार असल्याचे बोललं जात आहे.

प्राध्यापक भरती आणि तासिका प्राध्यापकांचा प्रश्न सुटणार का?

महाराष्ट्र सरकारनं प्राध्यापक भरतीवर बंदी घातलेली आहे. पुण्यात आंदोलन करणाऱ्या सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या आंदोलकांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री भेट घेणार आहेत. या भेटीत प्राध्यापक भरती आणि तासिका प्राध्यापकांचा प्रश्न सुटणार का हे पाहावं लागणार आहे.

21 जूनपासून आंदोलन

सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समिती या संघटनेच्या वतीनं पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन 21 जून पासून करण्यात येत आहे. पुण्यात आंदोलन करणाऱ्या या प्राध्यापकांना विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा देखील दिला आहे. प्राध्यापक भरती सुरु करावी आणि इतर राज्यांच्या धरतीवर मासिक भत्ता बंद करून समान वेतन धोरण जाहीर करा, अशी मागणी संघटनेनं केली आहे. (CHB Professor Protest in Pune last four days Outside the office of the Director of Higher Education in Pune)