State Women’s Commission: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार

चंद्रकांत पाटील यांनी रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या पवार साहेब यांनीच ही संस्कृती NCP कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच 'हात' आहे? असा खोचक सवाल विचार रोहित पवारांवर टीका केली आहे.

State Womens Commission: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
rupali chakankar
| Updated on: May 17, 2022 | 2:08 PM

पुणे – काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या(Union Minister Smriti Irani) दौऱ्यात पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर दोन्ही पक्षाकडून आरोप-प्रत्यारोपणाच्या फैरी झडत आहेत. आता मारहाणीची राज्य महिला आयोगाकडे(State Women’s Commission)  तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणाकर यांच्यकडेए तक्रार केली आहे. या तक्ररीद्वारे भाजपा पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांना मारहाण केली. या मारहाणीचे व्हीडीओ सर्वत्र व्हायरल झाले. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी या घटनेची दखल घेत भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल केले.

भाजपच्या शिष्टमंडळाची पोलिसांकडे तक्रार

याबरोबरच पुणे भाजपच्या शिष्टमंडळानेही डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या दौऱ्यात झालेल्या गोंधळासंदर्भात करणार पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारची शहरात मोगलाई सुरु असून भाजप कार्यकर्त्यांवर विनयभंगासारखे गंभीर गुन्हे लावण्यात आले असल्याचा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले आहेत.

अंडी फेकणं  कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल?

त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या पवार साहेब यांनीच ही संस्कृती NCP कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच ‘हात’ आहे? असा खोचक सवाल विचार रोहित पवारांवर टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांनी काळाच्या घटनेवर भाजपानं महाराष्ट्राची संस्कृती बिघडवू नये अशा पद्धतीचं केलं होतं ट्विट केले होते. यामुळे आता पुण्यातील राड्यावरून चंद्रकांत पाटील आणि रोहीत पवारांमध्ये जूंपलेली पाहायला मिळत आहे.