Pune Corona alert |पुण्यात कोरोना वेगाने पसरतोय ; आठवड्यात रुग्णसंख्येत तिप्पट वाढ ; जम्बो कोविड सेंटर सज्ज

पिंपरी चिंचवडमध्येही कोरोना व ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षत घेत पुन्हा जम्बो कोविड सेंटर तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. येत्या 15  जानेवारीपासून पुन्हा 800 बेडसह सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये 609 बेड ऑक्सिजनयुक्त, 200 आयसीयू बेड उपलब्ध केले जाणार आहेत.

Pune Corona alert |पुण्यात कोरोना वेगाने पसरतोय ; आठवड्यात रुग्णसंख्येत तिप्पट वाढ ; जम्बो कोविड सेंटर सज्ज
कोरोना
| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 10:59 AM

पुणे- शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या प्रशासनासाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. गेल्या आठवडाभरात शहरातील करोना संसर्गाच्या दरात तब्बल दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. आठवड्यात रुग्णसंख्या पाच टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर पोहचली आहे. वाढत्या संख्येमुळं सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येबरोबरच ओमिक्रॉनची रुग्ण संख्याही वाढत आहे. शहारातील जम्बो कोविड सेंटरची गरज पडल्यास लगेच सुरु करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.

आठवडाभरातील रुग्ण संख्या
30 डिसेंबर रुग्ण संख्या – 298 टक्केवारी 4.83 ,

31 डिसेंबर रुग्ण संख्या 412 टक्केवारी 5.93  ,

1 जानेवारी रुग्ण संख्या – 399 टक्केवारी5.25 ,

2 जानेवारी रुग्ण संख्या -524 टक्केवारी 7.72 ,

3 जानेवारी रुग्ण संख्या – 444 टक्केवारी 6.72  ,

4 जानेवारी रुग्ण संख्या -1104  टक्केवारी 16.19,

5 जानेवारी रुग्ण संख्या -1805 टक्केवारी 13.42 ,

6 जानेवारी रुग्ण संख्या – 2284  टक्केवारी 14.47 ,

ओमिक्रॉनची रुग्णसंख्येत वाढ

शहरातील कोरोना रुग्ण संख्येबरोबरच ओमिक्रॉनची रुग्ण संख्याही वाढ आहे. मात्र या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी साधा ताप, सर्दी, खोकला यांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. इतकंच नव्हे तर घरांमध्येही स्वतः:चे विलगीकरण करून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार घ्याव असेही सांगण्यात आले आहे. काळ ( गुरुवार) पुणे जिल्ह्यात ओमिक्रॉनचे 9  रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 154 वर जाऊन पोहचली आहे.

पिंपरीत जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार

पिंपरी चिंचवडमध्येही कोरोना व ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षत घेत पुन्हा जम्बो कोविड सेंटर तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. येत्या 15  जानेवारीपासून पुन्हा 800 बेडसह सुरू करण्यात येणार आहे.त्यामध्ये 609 बेड ऑक्सिजनयुक्त, 200 आयसीयू बेड उपलब्ध केले जाणार आहेत.

टीईटी परीक्षा गैरप्रकारातील मुख्य आरोपींना 3 कोटी 85 लाख रुपये दिल्याचा आरोप, पुणे पोलिसांकडून नाशिक जळगावमध्ये अटकसत्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय : 6 हजार ग्रामपंचायतीमध्ये उभारले जाणार हवामान केंद्रे, नेमका काय होणार फायदा?

Corona: मुंबईत दररोज 20 ते 30 टक्क्यांची रुग्णवाढ, Ambulance Helpline ची ही यादी आत्ताच Save करा!