पुण्यात पुन्हा लसींचा तुटवडा, दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याची वेळ

| Updated on: Aug 07, 2021 | 12:13 PM

Pune Coronavirus | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीचे दोन दिवस लसीकरण मोहीम ठप्प होती.

पुण्यात पुन्हा लसींचा तुटवडा, दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याची वेळ
लसीकरण मोहीम
Follow us on

पुणे: पुण्यात पुन्हा एकदा कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहीम दोन दिवस बंद राहणार असून आता थेट सोमवारी लसीकरणाला सुरुवात होईल. सरकारकडून महापालिकेला शुक्रवारीही लस पुरविण्यात आलेली नाही, याचा फटका लसीकरण मोहिमेला बसलाय. शहरातील कोव्हीशील्ड लसीचे सर्व केंद्र आज बंद असणार आहेत. तर रविवारी महापालिकेने केंद्रांना सुट्टी दिलेली आहे. त्यामुळे या दोन दिवसात लस उपलब्ध झाली तर सोमवारीच लसीकरण सुरू होईल.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीचे दोन दिवस लसीकरण मोहीम ठप्प होती. राज्य सरकारकडून पुणे महानगरपालिकेला कोव्हिशिल्ड लसीचे 18 हजार डोस देण्यात आल्यानंतर बुधवारी लसीकरण मोहीम सुरु झाली होती. हे डोस संपल्यानंतर आता लसीकरण पुन्हा ठप्प झाले आहे. महापालिकेची 200 केंद्र असल्याने प्रत्येक केंद्रावर 100 डोस द्यायचे असले तरी किमान 20 हजार डोसची आवश्‍यकता असते.

पुण्यातील 607 गावांमध्ये आठवडाभरात एकही रुग्ण नाही, 42 गावांमध्ये हायरिस्क अलर्ट

कोरोना निर्बंधांच्या तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या पुण्यातील ग्रामीण भागात सध्या संमिश्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 607 गावांमध्ये गेल्या आठवडाभरामध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. परंतु, 194 गावांमध्ये अजूनही दररोज कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. तर 42 गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे की याठिकाणी प्रशासनाकडून हायरिस्क अलर्ट जारी करण्यात आला होता. भोर, वेल्हा आणि पुरंदर हे तालुके वगळता अन्य दहा तालुक्यांमध्ये कोरोनाचा धोका कायम असल्याचे चित्र आहे.

जेजुरीत गेल्या दोन महिन्यांपासून चिकनगुनिया आणि डेंग्यूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर जेजुरी नगरपरिषदेनेही उपाययोजनांचा वेग वाढवला आहे. स्थानिक पातळीवरच उपचार मिळणार असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या:

Coronavirus: पुण्यातील 607 गावांमध्ये आठवडाभरात एकही रुग्ण नाही, 42 गावांमध्ये हायरिस्क अलर्ट