VIDEO: ‘गुप्ता, मला पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो, पोलीस मुख्यालयाचं काम छा-छू झालंय’

| Updated on: Jun 11, 2021 | 8:57 AM

या ठेकेदाराने पोलिसांचंच काम असं केलं असेल तर बाकीच्यांच काय, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. | Ajit Pawar

VIDEO: गुप्ता, मला पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो, पोलीस मुख्यालयाचं काम छा-छू झालंय
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

पुणे: पुण्यातील पोलीस मुख्यालयात करण्यात आलेल्या बांधकामावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांदेखत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना खडे बोल सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस मुख्यालयाचं काम अगदी छा-छू झालं आहे. ही पोलिसांची अवस्था असेल तर बाकीच्या कामांचं काय, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. (DCM Ajit Pawar slams police commissioner amitabh gupta over low quality work of pune police headquarters)

अजित पवार यांनी बुधवारी पुण्यातील पोलीस मुख्यालयाच्या कामाची पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा पाहून अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर अजित पवार यांनी थेट आयुक्तांना सुनावले. गुप्ता, मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर ह छा-छू काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचंच काम असं केलं असेल तर बाकीच्यांच काय, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. तसेच अधिकाऱ्यांना या सर्व त्रुटी सुधारण्याच्या सूचनाही दिल्या.

दरम्यान, अजित पवार यांनी कोरोना काळात योगदान दिलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला. कोविड काळात जे पोलीस मृत झाले त्यांच्या कुटुंबियांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यानंतर अजित पवार विधानभवात कोरोना आढावा बैठक घेणार आहेत. तर सायंकाळी चार वाजता जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार आहेत.

संबंधित बातम्या:

अजित पवार सरकार चालवत आहेत, नंतर शिवसेनाही चालवतील : अविनाश जाधव

झोपेत असताना सरकार जाईल, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा टोला, म्हणाले…

Ajit Pawar : इक्बाल चहल, शेवटी माझ्या लेकामुळेच मी BMC मध्ये आलो : अजित पवार

(DCM Ajit Pawar slams police commissioner amitabh gupta over low quality work of pune police headquarters)