एस.टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी व मनसेचा पाठींबा

| Updated on: Nov 09, 2021 | 6:21 PM

अनेक ठिकाणी एस.टी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणास वैतागून स्वतःचे जीवन संपवले आहे . राज्य सरकार व विरोधी पक्ष हे मात्र एस.टी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही . पाच वर्षे सत्तेत असताना भाजप, शिवसेना या पक्षाने एस.टी कर्मचाऱ्यांची कोणतीही दाखल घेतली नाही. आता सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडी सरकारने कामगारांच्या या प्रश्नापासून पळ काढला आहे.

एस.टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी व मनसेचा पाठींबा
bus
Follow us on

पुणे- एसटी महामंडळाचा राज्य सरकारमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. ठिकठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवसनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडीने पाठींबा दिला आहे.

एस.टी कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य होत नसल्यामुळे संप पुकारला आहे. यात प्रामुख्याने एस.टी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी दर्जा प्राप्त व्हावा ही मागणी आहे. तसेच तुटपुंज्या व अनियमित वेतनामुळे कर्मचारी यांच्या आत्महत्या होत असून , राज्यसरकार या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.

अनेक ठिकाणी एस.टी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणास वैतागून स्वतःचे जीवन संपवले आहे . राज्य सरकार व विरोधी पक्ष हे मात्र एस.टी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही . पाच वर्षे सत्तेत असताना भाजप, शिवसेना या पक्षाने एस.टी कर्मचाऱ्यांची कोणतीही दाखल घेतली नाही. आता सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडी सरकारने कामगारांच्या या प्रश्नापासून पळ काढला आहे. एस.टी आगारात सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास दडपण्यासाठी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची , नोकरीवरून निलंबित करण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. मात्र आम्ही एसटीकर्मचाऱ्यांच्या बाजूने उभ आहोत. असे पत्रक काढत वंचित बहुजन आघाडीने या संपाला पाठींबा दिला आहे.

या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुक्याच्या वतीने लेखी पत्राद्वारे जाहिर पाठिंबा देण्यात आला . यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जुन्नर तालुका अध्यक्ष जुबेर शेख, तालुका उपाध्यक्ष संतोष डोळस जुन्नर तालुका महासचिव सागर जगताप, जुन्नर तालुका सचिव विनायक रणदिवे, जुन्नर तालुका सहसचिव आरिफ पटेल, जुन्नर तालुका प्रसिद्धी प्रमुख संदेश वाव्हळ,जुन्नर तालुका संघटक मंदार कोळंबे उपस्थित होते.

दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्मण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजीनगर बस स्थानकाबाहेरील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात  सहभागी होत,जोरदार घोषणाबाजी केली. प्रवाश्यांचे हाल होत असताना शासनाने हा संप चिघळण्याची वाट बघू नये. तसचे कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असेही पत्रक काढून सांगण्यात आले आहे.

हो ही वाचा

VIDEO: राज्य शासनाचा जीआर अमान्य, एसटी कर्मचारी संपावर ठाम; संप अधिक चिघळण्याची शक्यता

मुंबई-नाशिक महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; 24 तासांत 5 ठार, दोन दुचाकीच्या टक्करमध्ये आज एक जण गतप्राण

तुला पैसे प्रिय का प्रेयसी? त्याच्या ओठांना लावला विषाचा प्याला, भर दिवाळीत प्रियकर बेशुद्ध, काय घडलं जालन्यात?