“पोटनिवडणुकीत विरोधकांवर देवेंद्र फडणवीस यांनी शड्डू ठोकला “; मतदारांचा कौलही सांगितला…

| Updated on: Feb 23, 2023 | 9:28 PM

उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा हे हिंदुत्वावादी असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना आवाहन करत तुम्ही मतदान कुणाला करणार असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

पोटनिवडणुकीत विरोधकांवर देवेंद्र फडणवीस यांनी शड्डू ठोकला ; मतदारांचा कौलही सांगितला...
Follow us on

पुणेः पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आता शिगेला पोहचला आहे. आजच्या प्रचारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी भाजपच्या कमळ चिन्हाचे बटण दाबून हेमंत रासने यांनाच विजयी करा असे मतदारांना आवाहन करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना त्यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून विरोधकांवर दुटप्पीपणाची टीका करत त्यांच्यावर तोफ डागली.

हेमंत रासने या उमेदवाराचा प्रचार करताना कसबा हे पुण्यातील गिरीश बापट यांनी येथील मतदार संघ बांधून ठेवला असल्याचे म्हणत त्यांनी त्यांचे आभार मानले आहे.

याच पुण्यात विरोधकांकडून ब्राह्मण नाराज असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या मात्र आताच्या पोटनिवडणुकीत मतदरा योग्य विचार करून ते भाजपलाच मतदान करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कसबा पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आव्हान करत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहूजी वस्ताद आणि आम्ही महात्मा फुले यांचा विचार सांगणारे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा हे हिंदुत्वावादी असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना आवाहन करत तुम्ही मतदान कुणाला करणार असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन विरोधकानी केले आहे. त्यासाठी त्यांनी मेलेल्या मुसलमानानाही घेऊन येऊ असा नारा विरोधकांनी दिला होता असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे लोकांना भरकवटण्याचं कामही विरोधकांनी केले आहे असंही त्यांनी सांगितले.

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी विरोधकांवरही तोफ डागली. विरोधक हे दुटप्पी असल्याचे सांगत निर्णय यांनी घ्यायचे आणि त्या चुकीच्या निर्णयावर आम्ही निर्णय घ्यायचे. त्याही पुढे जाऊन हे निर्णय आम्हीच कसे घेतो हे ही सांगायचे काम विरोधक करत असतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.