दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, उदयनराजे आणि माझं सर्वच मुद्द्यांवर एकमत: संभाजी छत्रपती

| Updated on: Jun 14, 2021 | 2:45 PM

दोन्ही छत्रपती घराण्याने समाजाला नेहमीच दिशा दिली आहे. दिशाभूल करणं, संभ्रम निर्माण करणं आमच्या रक्तात नाही, असं सांगतानाच खासदार उदयनराजे भोसलेंबरोबर सविस्तर चर्चा झाली. (Sambhajiraje Chhatrapati)

दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, उदयनराजे आणि माझं सर्वच मुद्द्यांवर एकमत: संभाजी छत्रपती
Sambhaji Chhatrapati
Follow us on

पुणे: दोन्ही छत्रपती घराण्याने समाजाला नेहमीच दिशा दिली आहे. दिशाभूल करणं, संभ्रम निर्माण करणं आमच्या रक्तात नाही, असं सांगतानाच खासदार उदयनराजे भोसलेंबरोबर सविस्तर चर्चा झाली असून सर्वच मुद्दयांवर आमचं एकमत आहे. आमच्यात कोणतंही दुमत नाही. आम्ही नेहमीच एकत्रित काम करत आलो आहोत, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे. (Discussion Between Sambhaji Chhatrapati and Udayanraje Bhosale over maratha reservation)

संभाजी छत्रपती यांनी आज उदयनराजे भोसले यांच्याशी मराठा आरक्षणावर 25 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर दोन्ही राजेंनी मीडियाशी संवाद साधून मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 338 बी नुसार आयोग स्थापन करावं लागेल. मराठा समाज हा सामाजिक मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल. हा अहवाल राज्यपालांना पाठवावा लागेल. राज्यपाल राष्ट्रपतींना पाठवतील, मग तो केंद्रीय मागास आयोगाकडे जाईल. त्यांना वाटल्यास ते आरक्षण देतील. आरक्षण मिळण्यासाठीचे मी दोन चार पर्याय दिले आहेत. त्यामुळे कोणत्या मार्गाने जायचं हे राज्यकर्त्यानेच ठरवावं, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

मूक आंदोलन होणारच

येत्या 16 जून रोजी कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन होणार आहे. आम्हाला 36 जिल्ह्यात जायचं नाही. आता त्यावर तुम्हीच मार्ग काढा. आम्ही सहा मागण्या दिल्या आहेत. त्या मान्य करा. तुमचं स्वागत करू, असं सांगतानाच मराठा आरक्षणावर समाज बोलला, आम्ही बोललो. आता लोक प्रतिनिधींनी बोलायला हवं, असं ते म्हणाले. अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करा, अशी मागणीही त्यांनी केली.

दोन घराणे एकत्र

उदयनराजेंना बऱ्याच वर्षानंतर भेटलो. एरव्हीही भेटत असतो. पण सातारा आणि कोल्हापूर हे दोन घराणे एकत्र आले. एका मोठ्या विषयावर आम्ही एकत्र आलो याचा आम्हाला आनंद आहे, असं ते म्हणाले.

अजितदादांच्या भेटीची कल्पना नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत शाहू महाराजांची कोल्हापुरात जाऊन भेट घेतली. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. अजित पवार पॅलेसमध्ये येणार याची मला वैयक्तिक माहिती नव्हती. अजितदादांचा मला फोन आला नव्हता. मला पॅलेसमधून तसं कळलं. शाहू महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी ते गेले असतील. त्यांच्या भेटीतील चर्चेबाबत मला काहीही कल्पना नाही, असं त्यांनी सांगितलं. (Discussion Between Sambhaji Chhatrapati and Udayanraje Bhosale over maratha reservation)

 

संबंधित बातम्या:

उद्रेक झाला तर जबाबदार कोण?, कोर्ट कचेऱ्यांवर विश्वास नाही: उदयनराजे भोसले

मोठी बातमी : संभाजीराजे आणि उदयनराजेंची पुण्यात भेट, मराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र

कोल्हापूरकरांनो, आम्हाला हौस नाही, थोडं सोसा, अजित पवारांनी दरडावलं

(Discussion Between Sambhaji Chhatrapati and Udayanraje Bhosale over maratha reservation)