पुण्याचे जिल्हाधिकारी ठरले विमल आजींसाठी श्रावण बाळ, आजींचे आयुष्य बनले सुखद

पुण्याचे जिल्हाधिकारी ठरले विमल आजींसाठी श्रावण बाळ, श्रावण बाळामुळे आजींचे आयुष्य बनले सुखद(district collector became shravan bal for vimal aaji)

पुण्याचे जिल्हाधिकारी ठरले विमल आजींसाठी श्रावण बाळ, आजींचे आयुष्य बनले सुखद
श्रावण बाळामुळे आजींचे बनले सुखद
| Updated on: Feb 09, 2021 | 6:13 PM

पुणे : सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र या म्हणीच्या अगदी उलट गोष्ट पुण्यातल्या विमल आजींच्या बाबतीत घडलंय. विमल आजींसाठी पुण्याचे जिल्हाधिकारीच श्रावण बाळ ठरलेत. या श्रावण बाळामुळे या आजींचे जीवन आता खूप सुखद बनलंय. (district collector became shravan bal for vimal aaji)

कोण आहेत विमल आजी?

पुण्याच्या विमल लोखंडे अर्थात सर्वांच्या हक्काच्या विमल आजी. वयाच्या सत्तरी गाठलेल्या या विमल आजी प्रांत कार्यालयाबाहेर बसलेल्या असतात. प्रांत कार्यालयात सरकारी कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना अर्ज भरणा करण्यात येणाऱ्या सोडवण्याचे काम या आजी इथे करतात. साधारण पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख हे प्रांत कार्यालयाच्या इमारती पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची नजर विमल आजींवर गेली. तात्काळ जिल्हाधिकारी देशमुख विमल आजींकडे धाव घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी विमल आजींनी आपली कहानी त्यांना सांगितली आणि एका मिनिटातच आजींच्या उदरनिर्वाहचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवला. जागेवरच श्रावण बाळ योजनेचा फायदा या आजींना मिळवून देत खऱ्या अर्थाने जिल्हाधिकारी विमल आजींचे श्रावण बाळ बनलेत. माझ्यासाठी जिल्हाधिकारी देवदूत बनल्याची भावना विमल आजींनी व्यक्त केलीय.

लोकांना मदत करुन मिळवतात पैसे

विमल आजी गेल्या 14 ते 15 वर्षांपासून नागरिकांना सरकारी कामात येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे काम करतात. विविध प्रकारचे अर्ज भरून देण्यासाठी नागरिकांना त्या मदत करतात आणि नागरिक देतील तेवढे पैसे घेऊन त्या समाधानी असतात. मात्र आता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विमल आजींना श्रावण बाळ योजनेतून दर महिना एक हजार रुपये मिळणार आहेत. विमल आजींना तीन मुलं आहेत. पण तरीही त्या एकट्या राहतात. त्यांची काळजी घ्यायला कोणी नाही. हीच बाब जिल्हाधिकाऱ्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी या आजींना एक मिनिटात सरकारी योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे विमल आजींसाठी डॉ. राजेश देशमुख हे श्रावण बाळ ठरलेत.(district collector became shravan bal for vimal aaji)

 

 

इतर बातम्या

‘हे सगळे तथाकथित सेलिब्रिटी, सरकारचे अनुदान घ्यायला सोकावले’, राजू शेट्टींचं चौकशीला समर्थन

पुणे नगर हायवेवर दिवसा ढवळ्या गोळीबार, लोणीकंद परिसरात भीतीचं वातावरण