NCP Youth Congress : सरळसेवा भरती प्रक्रिया खासगी कंपन्यांकडून नकोच; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पवारांना साकडे

राज्य सरकारशी बोलून तुम्ही हा प्रश्न सोडवावा अशी विनंती केली आहे. याबरोबरच सरळसेवा भरतीची प्रक्रिया ही MKCL , TCS व IBPS द्वारे घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

NCP Youth Congress : सरळसेवा भरती प्रक्रिया खासगी कंपन्यांकडून नकोच; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पवारांना साकडे
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 7:14 PM

पुणे – सरळसेवा भरतीची प्रक्रियेतील गट ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड संवर्गातील सरळसेवेची पदभरती आता जिल्हा, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समितीमार्फत आणि खासगी कंपनीद्वारे ऑनलाइन परीक्षेच्या(Online Exam) माध्यमातूनच होणार असल्याचे नुकतेच स्पष्ट करण्यात आले आहे. आयोगाच्या खासगी कंपन्यांकडून परीक्षा घेण्यास आता विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं ( NCP Youth Congress)आता याबाबत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे निवेदन देत मागणी केली आहे.  राज्यातील सरळसेवा भरतीची प्रक्रिया खाजगी कंपन्यांमार्फत घेऊ नये असे त्यांनी आपल्या मागण्यांमध्ये म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मागणी लावून धरली आहे.

ही केली मागणी

याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं शरद पवार यांना निवेदनही दिले आहे. राज्य सरकारशी बोलून तुम्ही हा प्रश्न सोडवावा अशी विनंती केली आहे. याबरोबरच सरळसेवा भरतीची प्रक्रिया ही MKCL , TCS व IBPS द्वारे घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सरळसेवा भरतीची प्रक्रिया खासगी कंपन्यामार्फत घेण्यास विद्यार्थ्याचा विरोध आहे. याबाबत राज्यमंत्री बच्चु कडू यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

 गैरप्रकरामुळे संकेतस्थळ बंद

यापूर्वी दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड संवर्गातील सरळसेवेची पदे महापरीक्षा संकेतस्थळामार्फत भरली जाणार होती. मात्र महापरीक्षा संकेतस्थळातील प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्याने हे संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर खासगी कंपन्यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून ओएमआर पद्धतीने परीक्षा घेऊन पदभरती करण्याचा निर्णय 2021 मध्ये घेण्यात आला आहे.