पोलीस कोठडीत ललित पाटील याची प्रकृती बिघडली, काय सुरु झाला त्रास?

Lalit Patil | पुणे येथील ससून रुग्णालयातून उघड झालेल्या ड्रग्स प्रकरणात ललित पाटील हा पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची प्रकृती पोलीस कोठडीत बिघडली आहे. त्याच्यावर पोलीस कोठडीतच डॉक्टर उपचार करत आहे. चार दिवसांपासून त्याला जुन्या आजारांचा त्रास होत आहे.

पोलीस कोठडीत ललित पाटील याची प्रकृती बिघडली, काय सुरु झाला त्रास?
Lalit Patil
| Updated on: Nov 11, 2023 | 1:03 PM

अभिजित पोते, पुणे, | 11 नोव्हेंबर 2023 : नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या ललित पाटील कारगृहात होता. एका ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती. मागील तीन वर्षांपासून तो येरवडा कारागृहात होता. या तीन वर्षांच्या काळात नऊ महिने ससून रुग्णालयात विविध उपचाराच्या नावाखाली तो राहिला. त्यानंतर ससून रुग्णालयातून काही दिवसांपूर्वी तो फरार झाला होता. पंधरा दिवस फरार राहिल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातून अटक केली. या दरम्यान मुंबई पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला कोठडीत घेतले. पुणे पोलिसांच्या कोठडीत त्याची प्रकृती बिघडली आहे. त्याला पुन्हा जुन्या आजारांचा त्रास होत आहे. त्याच्यावर कोठडीतच उपाचार केले जात आहे.

काय सुरु झाला ललित पाटील याला त्रास

ललित पाटील याची तब्येत पुन्हा बिघडली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्याला पोटदुखी आणि हर्नियाचा त्रास सुरू झाला आहे. परंतु त्याला आता ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न करता पोलीस कोठीतच उपचार दिले जात आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ललित पाटील याच्यावर यापूर्वी स्वत: ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर उपचार करत होते. त्याला टीबी आजारासह पाठदुखीचा देखील आजार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याला हार्नियाही झाला होता. लठ्ठपणाचा आजारही त्याला दाखवण्यात आला होता.

आमदार धंगेकर यांचा पुन्हा आरोप

ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूर यांना निलंबित केले. कालचा अहवाल आणि ठाकूर यांच्यावर कारवाई झाली. ही कारवाई म्हणजे नाटक आहे. संजीव ठाकूर यांना वाचवण्याचे काम सरकार करत आहे. संजीव ठाकूरवर मोक्का कारवाई करायला हवी. तसेच नार्को टेस्ट करा, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. सरकार या प्रकरणात लोकांना वेड्यात काढत आहे. लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. या प्रकरणात ज्यांनी, ज्यांनी पैसे घेतले आहेत, त्यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. तसेच दोषी आढळतील त्या सगळ्यांना सहआरोपी करा, असे आमदार धंगेकर यांनी म्हटले.