रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे कडाडले, म्हणाले “आता कळेल…”

पुण्याचे काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षांतरानंतर काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. धंगेकर यांचा शिवसेनेतील प्रवेश सोहळा मुंबईत झाला.

रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे कडाडले, म्हणाले आता कळेल...
eknath shinde ravindra dhangekar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 10, 2025 | 10:54 PM

पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलं. त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आज मुंबईत पार पडला. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत मंत्री उदय सामंत, उपसभापती नीलम गोऱ्हे, प्रकाश सुर्वे हे उपस्थितीत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आता लोकांना धंगेकर कोण आहे ते कळेल, असे ओपन चॅलेंज केले.

रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी रवींद्र धंगेकर यांचे शिवसेनेत स्वागत केले. रवींद्र धंगेकर यांचा प्रवास नगरसेवकापासून आमदारापर्यंत झाला. ते एक आदर्श कार्यकर्ता आहेत. ते १० वर्ष शिवसेनेचे नगरसेवक होते. आता ते पुन्हा स्वगृही आले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

आता लोकांना कळेल who is dhangekar?

आता तुम्ही शिवसेनेत आला आहात. आता लोकांना कळेल who is dhangekar? पोटनिवडणूक गाजली. मात्र एवढं करून पण धंगेकरांनी बाजी मारली आणि तिथे त्यांनी दाखवून दिलं लोकसेवक म्हणजे काय असतं. काँग्रेस हा वेगळ्या टाईपचा पक्ष आणि हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे. इथे कामाने लोकनेता ओळखला जातो. तुम्हाला माहित आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. आज पुणेकर मी त्यांना काँग्रेसचे म्हणणार नाही, कारण ते मूळ शिवसेनेचे आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

२०२२ ला ३३ देशांना कळलं की who is eknath shinde?

रवींद्र धंगेकर यांची पुण्यात लोकप्रिय नेता म्हणून ओळख आहे. मी तिकडे पुण्यात निवडणुकीला गेलो होतो. मात्र सगळी फौज लागली तरी रवींद्र धंगेकर यांनी ती पोटनिवडणूक गाजली. रवींद्रने बाजी मारली. मला लोकांनी हलक्यात घेतलं. मात्र २०२२ ला ३३ देशांना कळलं की who is eknath shinde? असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.

शिवसेनेत यायला उशीर केला, पण हरकत नाही…

मी म्हटलं होत माझ्यासोबत आलेले लोक जर निवडून आले नाही तर शेती करायला जाईल. काल बाळासाहेबांचा नकली आवाज कार्यक्रमात लावला. म्हणे आम्ही बाळासाहेबांच्या आवाजाच्या कॅसेट जपून ठेवल्या, त्यांचे विचार जपून ठेवायचे होते ना. रवींद्र धंगेकर यांचा सारखा आदर्श कार्यकर्ता असावा. आपल्याला शुभेच्छा, आपण स्वगृही आलेला आहे. तुमचा काँग्रेससोबत वादविवाद नव्हता, मात्र तुम्हाला बळ पाहिजे होते, तुम्हाला दुःख होत होते, मात्र थोड्या दिवसात तुम्हाला उशीर झाला शिवसेनेत यायला याचे दुःख होईल. राजन साळवी यांनी पण उशीर केला, पण ठीके देर आये दुरुस्त आये. उदय सामंत यांचेही अभिनंदन करतो, त्यांनी बरोबर तुमचा योग घडवून आणला, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.