वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना, छळाला कंटाळून विवाहितेनं आयुष्य संपवलं

वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी एका विवाहितेनं सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना, छळाला कंटाळून विवाहितेनं आयुष्य संपवलं
| Updated on: May 22, 2025 | 6:26 PM

पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे, पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे हिने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती आणि सासरच्या लोकांकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून पुण्यात आणखी एका विवाहितेनं आपलं आयुष्य संपवलं आहे. या महिलेनं राहात्या घरात गळफास घेतला. दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी (वय २२, रा. सातववाडी, हडपसर)  असं या महिलेचं नाव आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पती, तसेच सासरकडील नातेवाइकांच्या छळामुळे महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्याच्या हडपसर भागात घडली आहे. या प्रकरणात तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पतीसह सासरकडील नातेवाइकांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी (वय २२, रा. सातववाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत दीपाचे वडील गुरुसंगप्पा म्यागेरी (वय ५३, रा. कर्नाटक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात दीपाचा पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, दीर प्रसन्न चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा चंद्रकांत पुजारी,  सासरा चंद्रकांत पुजारी यांच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी मुळ कर्नाटक राज्यातील असून, एक महिन्यांपूर्वीच दीपा आणि प्रसाद यांचा विवाह झाला होता.

समोर आलेल्या माहितीप्रमाणे दीपा आणि प्रसाद यांचा कर्नाटकमध्ये अरेंज मॅरेज झालं होतं. मुलगी उच्चशिक्षित होती, हे सर्व आरोपी  मूळचे कर्नाटकचे आहेत, गेल्या अनेक दिवसापासून आरोपीचे कुटुंब पुण्यातील हडपसर भागात राहण्यास होते. महिनाभरापूर्वीच दीपा उर्फ देवकीचा विवाह प्रसाद पुजारी याच्यासोबत झाला होता. मात्र तिने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. या प्रकरणात तिचा पती, सासू, सासरा आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.