कोरोनामुळे मृत्यू झाल्याची व्हॉट्सॅपवरून अफवा; मृताच्या अंत्यसंस्कारासाठी वणवण

| Updated on: May 08, 2021 | 9:38 AM

सांगलीत अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. (fake messages on whatsapp, nobody help covid relatives in sangli)

कोरोनामुळे मृत्यू झाल्याची व्हॉट्सॅपवरून अफवा; मृताच्या अंत्यसंस्कारासाठी वणवण
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

सांगली: सांगलीत अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची अफवा पसरल्याने त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी वणवण करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे एकच संताप व्यक्त केला जात असून व्हॉट्सअॅपवरून अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (fake messages on whatsapp, nobody help covid relatives in sangli)

कवठेमहांकाळ येथील राजणीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. राजणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह होते. तरीही कुणीतरी व्हॉट्सअॅप ग्रुपवरून या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची अफवा पसरवली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीला कोणीच धजावले नाही. अनेकांना विनंती केल्यानंतर शेवटी या कुटुंबाने अंत्यविधीसाठी मृतदेह बैलगाडीत टाकून स्मशानभूमीपर्यंत नेला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

कारवाईचे आदेश

कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या अफवेमुळे या कुटुंबाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तर घडलेला प्रकार अत्यंत दुर्देवी असल्याचं सांगत तहसीलदाराने कारवाईचे आदेश दिले आहेत.

राज्यात 54 हजार नवे रुग्ण

राज्यात गेल्या 24 तासांत 54022 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 37386 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 4265326 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 654788 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.36% झाले आहे.

सांगली 2328 नवे कोरोना रुग्ण

>> जिल्ह्यात गेल्या 24 तासांत आढळले 2328 नवे कोरोना रुग्ण

>> जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 38 रुग्णांचा मृत्यू

>> मृतांचा आकडा 2511 वर

>> सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15902 वर

>> उपचार घेणारे 1134 जण कोरोनामुक्त

>> गेल्या 24 तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 67234 वर

>> जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 85647 वर (fake messages on whatsapp, nobody help covid relatives in sangli)

 

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सांभाळा; संसर्ग रोखण्यासाठी घ्या मुलांची काळजी

Corona Vaccine | देशभरात 16 कोटी 71 लाख लाभार्थ्यांना कोरोना लस, कोणत्या वयोगटातील नागरिकांना कितपत लाभ?

नातेवाईकांचा कोरोना रुग्णांसोबत रुग्णालयातच मुक्काम; औरंगाबादमध्ये खळबळ

(fake messages on whatsapp, nobody help covid relatives in sangli)