Pune Crime: पुण्यात बनावट मतदान ओळखपत्र,आधारकार्ड बनवून देणाऱ्याचा पर्दाफाश, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

| Updated on: May 15, 2022 | 6:03 PM

आरोपी बोहरा बनावट मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये घेत होता, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

Pune Crime: पुण्यात बनावट मतदान ओळखपत्र,आधारकार्ड बनवून देणाऱ्याचा पर्दाफाश, आरोपीच्या मुसक्या आवळल्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पुणे- शहरात मागील काही दिवसांपासून बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड(Pan card)  बनवून देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) बुलढाण्यातील रहिवासी असणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दहा बनावट मतदार ओळखपत्र जप्त केली आहेत. आरोपीच्या संगणकात (Computer ) देखील अनेक बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड आढळून आल्या आहेत. पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधीपथकानं सापळा रचून पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली.आरोपी बोहरा बनावट मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये घेत होता, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

बनावट आधार कार्डसाठी घ्यायचा 10 हजार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बोहरा हा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. तसेच तो नागरिकांना बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड तयार करून देण्याच काम करत होता. बनावट मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड तयार करून देण्यासाठी तो पैसे घ्यायचा. याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनीसापळा रचून त्याला अटक केली आहे.  गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी मधुकर तुपसौंदर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

हे सुद्धा वाचा