गिरीश महाजन यांनी घेतली अश्विनी जगताप यांची भेट; भेटीदरम्यान त्यांनी विरोधकांना केलं हे आवाहन

| Updated on: Feb 04, 2023 | 7:28 PM

एखादा आमदार यांचं निधन झाल्यास ती जागा त्यांच्या कुटुंबातील उमेदवाराला देण्याची प्रथा आहे. ही परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं.

गिरीश महाजन यांनी घेतली अश्विनी जगताप यांची भेट; भेटीदरम्यान त्यांनी विरोधकांना केलं हे आवाहन
गिरीश महाजन
Follow us on

पुणे : कसबा आणि चिंचवडची (Chinchwad) दोन्ही नाव जाहीर झाली आहे. त्यामुळं आम्ही विधानसभा पोटनिवडणुकीच्या कामाला लागलो आहोत. सकाळी महाराष्ट्रातील सर्व सीईओंची ग्रामविकास खात्याची बैठक होती. तिथं गेलो होतो.पण, तिकीट जाहीर झाल्यानं चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना भेटण्यासाठी आलो. कसब्यामध्येही जाणार आहे, असं मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले. चिंचवड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं विजय मिळेल की, नाही हा विषयचं होऊ शकत नाही. विजय हा १०० टक्के भाजपचा होणार आहे, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. माजी आमदारांचं काम, त्यांचं राहिलेलं स्वप्न यांची मतदारांना माहिती आहे. त्यामुळं जगताप यांच्या घरातचं तिकीट मिळालं आहे.

यांच्याकडे राहणार निवडणुकीची धुरा

शंकर जगताप यांची तीन-चार वेळा या आठवड्यात भेट झाली. जगताप कुटुंबीयात कुठलाही संघर्ष नाही. जगताप कुटुंबीयांच्या घरात चांगलं वातावरण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीने ते राहतात. लक्ष्मण जगताप असताना असलेली परिस्थिती आजही आहे. त्यामुळं शंकर जगताप यांच्याकडे निवडणुकीची धुरा दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी तसं जाहीरही केलं आहे, असंही गिरीश महाजन म्हणाले.

शंकर जगताप यांच्या बोलण्यात कुठही काही नाही. उद्यापासून सगळे जोरात प्रचाराला कामाला लागतील. आम्ही निश्चित प्रयत्न करत आहोत. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. तशी प्रथा परंपरा आहे. मुंबईतील जागा शिवसेनेची (ठाकरे गट) असल्यानं आम्ही तिथं उमेदवार उभा केला नव्हता, याची आठवणी गिरीश महाजन यांनी करून दिली.

अशी प्रथा कायम राहावी

एखादा आमदार यांचं निधन झाल्यास ती जागा त्यांच्या कुटुंबातील उमेदवाराला देण्याची प्रथा आहे. ही परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं. चिंचवडची जागा बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही विनंती करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

काही ठिकाणी उमेदवार वेळेवर ठरलेत. आम्ही विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात कमी पडलो. पण, पुढं येणाऱ्या निवडणुकीत आम्ही नक्की विजय मिळवू, असंही गिरीश महाजन म्हणाले.

कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. चंचवड मतदारसंघासाठी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचे नाव जाहीर करण्यात आले. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात अश्विनी जगताप किंवा शंकर जगताप यांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता होती.