माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का; चुलत भावाचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

| Updated on: Jul 16, 2021 | 8:01 PM

भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू व माजी सभापती प्रशांत पाटील यांनी आज (16 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का; चुलत भावाचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
Follow us on

पुणे : भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू व माजी सभापती प्रशांत पाटील यांनी आज (16 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्यातील या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप ग़ारटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी हा पक्ष प्रवेश झाला. प्रशांत पाटील हे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर प्रशांत पवार म्हणाले, “राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात जोरदार काम करणार आहे. भाजपचे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत आणणार आहे.” आगामी काळात नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तसेच सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका देखील होणार आहेत. प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून या येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

नागपुरात सुबोध मोहिते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, प्रफुल पटेलांकडून सत्कार

नागपूर येथे आज (16 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपुर ग्रामीण विभागाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी नुकतेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा प्रफुल पटेल यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, “नागपुर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष व महिलाध्यक्षांनी पक्ष कार्याचा तालुका निहाय अहवाल सादर करून तालुक्यातील विविध समस्या मांडल्या. येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून शेतकरी, शेतमजूर व वंचित समाजाचे प्रश्न जाणून, त्यांचे निराकरण करण्याचे अभिवचन दिले.”

“जि.प, नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी सामान्य लोकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत व पक्ष विस्तार करण्यासाठी लोकांना पक्षाच्या विचारधारेत आणून पक्ष संघटन मजबूत करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले,” अशी माहिती पटले यांनी दिली.

हेही वाचा :

अजित पवार आणि अनिल परबांवर गुन्हा दाखल करुन CBI चौकशी करा, हायकोर्टात याचिका

पीक विम्याबाबत राज्य सरकारचं केंद्राला पत्र; शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, ‘सह्याद्री’वरील बैठकीत शरद पवारांची सूचना

राज्यात फलोत्पादनवाढीसाठी दिलेल्या शरद पवारांच्या सूचनांवर अंमलबजावणी करणार : अजित पवार

व्हिडीओ पाहा :

Harshvardhan Patil brother Prashant Patil join NCP