सागर सुरवसे, सोलापूर : राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली. राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंश सेल्सियसवर गेले आहे. या तापमान वाढीमुळे अनेक नागरिकांना उष्माघाताचा त्रास होतोय. वाढत्या तापमानामुळे राज्यातील सर्व शाळांना २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर केली आहे. शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात वाढती उष्णतेची लाट पाहता विविध उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहे. उन्हामुळे हैराण झालेल्या एका सोलापूरकर युवकाने केलेला प्रयोगाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
काय केले युवकाने
मागील काही दिवसांपासून सोलापूरचे तापमान दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. शहरातील तापमानाचा पारा 42 डिग्री सेल्सीयसच्या पुढे गेला आहे. शहरातील सरस्वती चौकात चक्क सिग्नलवर थांबलेल्या तरुणाने गाडीवरच थांबून आंघोळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झालाय. उन्हामुळे हैराण झालेल्या एका सोलापूरकर युवकाने चक्क सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीवर बसूनच अंघोळ केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
काय आहे व्हिडिओत
एका दुचाकीवर दोन तरुण सिग्नलजवळ थांबले आहे. यावेळी उन्हामुळे हैराण झालेल्या तरुणाने आपल्याजवळ पाणी ठेवले होते. मग त्या पाण्याने स्वत:च आंघोळ सुरु केली. त्यानंतर त्या तरुणाने स्वतःबरोबरच गाडी चालवणाऱ्या मित्राच्याही अंगावर पाणी टाकले. सिग्नलवर असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. मग हा व्हिडिओ आता सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय.
शाळांना सुटी
राज्यातील सर्व शाळांना २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर केली आहे. वाढत्या तापमानामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात वाढती उष्णतेची लाट पाहता शाळांना सुट्टी देण्याचे राज्य शासनाचे आदेश दिले आहे. विदर्भ वगळता इतर ठिकाणी आता सरळ 15 जूनला शाळा सुरू होणार आहे. तर विदर्भात 30 जूनला शाळा सुरू होणार आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश काढला आहे.
हे ही वाचा
Maharashtra Temperature : राज्यात पाऊस अन् तापमान वाढही, वाढत्या तापमानामुळे शासनाचा मोठा निर्णय